कमाल! एक फोटो काढण्यासाठी लावले 7 वर्ष, फोटोग्राफरने काढला असा फोटो नासाही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:32 PM2024-01-12T13:32:44+5:302024-01-12T13:33:13+5:30

इटलीतील ट्यूरिन शहरामध्ये वेलेरियो मिनाटो नावाच्या एका फोटोग्राफर असंच काहीसं केलं आहे.

Italian photographer took 7 years for million dollar rare moon alignment pic applaud from NASA | कमाल! एक फोटो काढण्यासाठी लावले 7 वर्ष, फोटोग्राफरने काढला असा फोटो नासाही हैराण

कमाल! एक फोटो काढण्यासाठी लावले 7 वर्ष, फोटोग्राफरने काढला असा फोटो नासाही हैराण

एक चांगला फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स खूप मेहनत घेतात. त्यांना परफेक्शनसाठी कधी कधी तर 15 ते 20 मिनिटांचा वेळही लागतो. पण कधी एखाद्याला एक फोटो काढण्यासाठी 7 वर्ष लागू शकतात? आणि लागलाच तर त्या फोटोत असं काय असेल?

इटलीतील ट्यूरिन शहरामध्ये वेलेरियो मिनाटो नावाच्या एका फोटोग्राफर असंच काहीसं केलं आहे. त्याचं ध्येय होतं की, त्याला एक वेगळा आणि आश्चर्यजनक फोटो क्लिक करायचं आहे. जो जगभरात 'फोटोग्राफ ऑफ द डिकेड'म्हणून ओळखला जाईल. त्याला या शोधात आणि प्लानिंग करण्यात 6 वर्ष लागली.

मिनाटोने दोन आयकॉनिक लॅंडमार्कसोबत अलाइन्ड चंद्राचा एक फोटो काढला. फोटोत बेसिलिका ऑफ सुपरगाचा घुमट आणि विशाल मोनविसो डोंगरामागे चंद्र आहे. हा फोटो इतका खास आहे की, स्पेस एजन्सी नासानेही त्याला सन्मानित केलं आहे.

2017 पासून मिनाटोने चंद्राचा हा खास फोटो क्लिक करण्यासाठी त्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी खूप अभ्यास केला. अनेकदा अडचणी आल्या. पण परफेक्ट फोटोचा नाद त्याने काही सोडला नाही.

एका न्यूज एजन्सीसोबत बोलताना मिनाटोने त्याच्या या प्रवासाबाबत सांगितलं. तो म्हणाला की, मी आधी ट्यूरिनमध्ये, आजबाजूच्या भागांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळे पॉइंट्स आणि अंतर बघण्यासाठी 2012 पासून शूटिंग करत आहे. एका निश्चित बिंदूवरून मला हा फोटो घ्यायचा होता. 

शेवटी 15 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता ती वेळ आली आणि माझ्या मेहनतीला यश मिळालं. आकाश साफ झालं आणि चंद्र त्या स्थितीत आला ज्याची मी वाट बघत होतो. 

Web Title: Italian photographer took 7 years for million dollar rare moon alignment pic applaud from NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.