वर्षातले तीन महिने अंधारात राहत होतं हे गाव, गावातील लोकांनी बनवला स्वत:चा 'सूर्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 02:16 PM2021-08-26T14:16:26+5:302021-08-26T14:22:08+5:30
तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने डोळे, हात, पाय बनवल्याचे पाहिले असेलच. मात्र, इटलीतील या गावात लोकांनी त्यांचा सूर्यच बनवला.
सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. पण काही भाग असेही आहेत जिथे काही महिने सूर्यप्रकाशच पडत नाही. इटलीतील एक गावही असंच आहे. जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांनी स्वत:चा वेगळा 'सूर्य' बनवून घेतला. इथे सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने येथील लोकांनी जुगाड करून एक आर्टिफिशिअल सूर्य तयार केला. तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने डोळे, हात, पाय बनवल्याचे पाहिले असेलच. मात्र, इटलीतील या गावात लोकांनी त्यांचा सूर्यच बनवला.
इटलीच्या विगल्लेना गावाला चारही बाजून डोंगराने वेढलं आहे. ज्यामुळे सूर्याचा प्रकाश या गावात पोहोचत नाही. हे गाव मिलानच्या उत्तर भागात १३० किमी खाली आहे. इथे साधारण २०० लोक राहतात. येथील लोकांनी बऱ्याच महिन्यांपासून सूर्याचं दर्शन घेतलं नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे सूर्याची एकही किरण पडत नाही. त्यामुळे गावातील एका आर्किेटेक्ट आणि इंजिनिअरने गावातील लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी आयडिया काढली. त्यांनी गावातील मेअरच्या मदतीने २००६ मध्ये विगल्लेगा गावात आर्टिफिशिअल सूर्य बनवला.
आर्किटेक्टने १ लाख यूरो खर्च करून ४० वर्ग किलोमीटरचा आरसा खरेदी केला आणि तो डोंगराच्या टोकावर लावला. हा आरसा अशाप्रकारे लावला की, त्यावर थेट सूर्याचा प्रकाश पडेल आणि त्याचं रिफ्लेक्शन गावावर पडेल. हा आरसा दिवसातील ६ तास लाइट रिफ्लेक्ट करतो ज्यामुळे गावात प्रकाश राहतो.
हा आरसा डोंगराच्या दुसऱ्या बाजूने १,१०० मीटर उंचीवर लावण्यात आला आहे. या आरशाचं वजन साधारण १.१ टन आहे. हा आरसा कॉम्प्युटरच्या माध्यामातून ऑपरेट केला जातो. अशाप्रकारे विगल्लेना गावातील लोकांनी आपल्यासाठी एक नवा सूर्य बनवला.