मोठा शोध! इटलीतील समुद्रात ३०२ फूट खोलात सापडला २२०० वर्ष जुन्या जहाजाचा मलबा आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:31 PM2021-08-03T17:31:00+5:302021-08-03T17:35:22+5:30
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात.
इटलीच्या सिसिलिया भागातील समुद्र तटावर पुरातत्ववाद्यांनी एका २२०० वर्ष जुन्या प्राचीन रोमन जहाजाचा मलबा शोधला आहे. ज्याचा वापर दारू आणि जैतूनच्या तेलाच्या वाहतुकीसाठी केला जात होता. सिलिलियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, जहाजाचा मलबा दुसरं शतक ई.पू मधील आहे. याचा शोध भूमध्य सागरात ९२ मीटर(३०२ फूट) खोलात इसोला डेले फेमिनजवळ घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेला हा शोध महत्वपूर्ण आहे. एम्फोर त्या प्राचीन मडक्याला म्हणतात ज्याला दोन्ही बाजूने व्हर्टिकल हॅंडल असतात. यांचा वापर प्राचीन काळात दारू आणि तेलाच्या परिवहनासाठी होत होता. इतिहासानुसार, साहित्य फोनीशिअनहून रोमपर्यंत पोहोचवलं जात होतं. इटलीतील वृत्तपत्र ला स्टांपामध्ये सांगण्यात आलं की, सिसिलियात दारूचा व्यवसाय फार फायद्याचा सौदा होता आणि त्यावेळी हाच उद्योग जास्त लोक करत होते.
त्यावेळच्या दारूला मॅमरटीनो म्हणत होते. जी इतकी प्रसिद्ध होती की, याने ज्यूलिअस सीझरचंही लक्ष आकर्षित केलं होतं.
इटलीतील आणखी एक वृत्तपत्र पालेर्मो टुडेनुसार, सिसिलिया भागात अधीक्षकाचं काम बेटावर पाण्यात आढळणारी ऐतिहसिक आणि नैसर्गीक वस्तूंची सुरक्षा करणं असतं. आतापर्यंत पाण्यातून होणाऱ्या व्यापाराच्या अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.
या अभियानाने मुख्य आणि सिसिलियाचे समुद्र अधीक्षक वेलेरिया ली विग्नी म्हणाले की, या शोधातून हे समजतं की, इथे समुद्रात अनेक प्राचीन अवशेष आहेत. ज्याने खोल समुद्रात शोध सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा चांगले परिणाम मिळतील. इटलीत याआधीही जहाजाचा मलबा शोधला गेला आहे. २०१२ मध्ये संशोधकांना २ हजार वर्ष जुन्या जहाजाचा मलबा मिळाला होता.