बोंबला! 'मला तुरूंगात टाका, पत्नीसोबत राहू शकत नाही'; पत्नी पीडित पतीची पोलिसांकडे विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:58 AM2021-10-25T11:58:56+5:302021-10-25T11:59:50+5:30

रोम पोलिसांनी रविवारी सांगितलं की, घरात नजरकैद असलेली व्यक्ती त्यांच्याकडे अचानक आली आणि तुरूंगात बंद करण्याची विनवणी करून लागला होता.

Italy man asks police to jail him as he cannot live with his wife | बोंबला! 'मला तुरूंगात टाका, पत्नीसोबत राहू शकत नाही'; पत्नी पीडित पतीची पोलिसांकडे विनवणी

बोंबला! 'मला तुरूंगात टाका, पत्नीसोबत राहू शकत नाही'; पत्नी पीडित पतीची पोलिसांकडे विनवणी

googlenewsNext

इटलीमध्ये (Italy) राहणारा एक पती आपल्या पत्नीला इतका वैतागला आहे की त्याने पोलिसांकडे विनंती केली त्याला तुरूंगात बंद करा. कारण त्याला पत्नीसोबत रहायचं नाहीये. या व्यक्तीला ड्रग्सच्या एका केसमध्ये घरातच नजरकैदेत राहण्याची  शिक्षा मिळाली आहे. अशात त्याला प्रत्येक क्षण पत्नीसोबत घालवावा लागतो. जे त्याच्यानुसार त्याच्यासाठी अवघड झालं आहे.

पत्नीसोबत राहून झाला हैराण

पत्नी पीडित व्यक्ती इटलीची राजधानी रोममध्ये राहणारा आहे. रोम पोलिसांनी रविवारी सांगितलं की, घरात नजरकैद असलेली व्यक्ती त्यांच्याकडे अचानक आली आणि तुरूंगात बंद करण्याची विनवणी करून लागला होता. या व्यक्तीने सांगितलं की, तो त्याच्या पत्नीसोबत घरात राहू शकत नाही. पत्नीसोबत राहणं तुरूंगात राहण्यापेक्षाही भयावह असल्याचं आहे. त्यामुळे त्याला तुरूंगात टाकण्यात यावं.

पत्नीच्या डिमांडमुळे वैतागला

हा ३० वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीच्या अजब डिमांडमुळे परेशान झालाय. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, व्यक्ती आपल्या पत्नीच्या डिमांड्समुळे वैतागला आहे. तो म्हणाला की, पत्नी जबरदस्ती सेक्स करण्यासाठी भाग पाडते. जे त्याच्यासाठी आता शक्य नाही. तो म्हणाला की, जेव्हा तो त्याच्या पत्नीची इच्छा पूर्ण करत नाही तेव्हा त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे त्याला घराऐवजी तुरूंगात टाका.

धावत थेट पोलीस स्टेशनमद्ये गेला

पोलिसांनुसार, नजरकैदेत असलेली व्यक्ती कशीतरी आपल्या घरातून पळून जाण्यात यशस्वी ठरली. तो थेट पोलीस स्टेशनमद्ये गेला. त्याने अधिकाऱ्यांना विनंती केली की, त्याला उरलेली शिक्षा तुरूंगात पूर्ण करू द्यावी. ही व्यक्ती अनेक महिन्यांपासून ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यासाठी घरात नजरकैद आहे आणि त्याची शिक्षा पूर्ण होण्यासाठी काही वर्ष शिल्लक आहेत.
 

Web Title: Italy man asks police to jail him as he cannot live with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.