आज भारतासाठी सर्वात छोटा दिवस; जाणून घ्या यामागचे शास्त्रीय कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:13 AM2022-12-22T07:13:47+5:302022-12-22T07:14:48+5:30
तुम्ही सध्या पाहत असाल तर सकाळी साडे सहापर्यंत अंधुक प्रकाशही पडत नाही, अन् सायंकाळी लवकर काळोखही पडतोय. या घटनेसाठी आजचा दिवस त्याहुनही छोटा असणार आहे.
आज खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची घटना घडणार आहे. तसा दरवर्षीच घडतो. तुम्ही सध्या पाहत असाल तर सकाळी साडे सहापर्यंत अंधुक प्रकाशही पडत नाही, अन् सायंकाळी लवकर काळोखही पडतोय. या घटनेसाठी आजचा दिवस त्याहुनही छोटा असणार आहे.
२२ डिसेंबर २०२२ हा दिवस जगासाठी सर्वात छोटा असणार आहे. आजचा दिवस १० तास आणि ४१ मिनिटांचा असणार आहे. तर रात्र १३ तास आणि १९ मिनिटांची असेल. तुमच्या ठिकाणानुसार हा वेळ इकडे तिकडे होऊ शकतो.
आजच्या दिवशी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर असेल. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असेल. भारताबद्दल बोलायचे झाले तर तिथे सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता होईल. सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटे असेल. आणि रात्रीची वेळ 13 तास 19 मिनिटे.
या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन 23 अंश 26 मिनिटे 17 सेकंद दक्षिणेकडे असेल. 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असेल, त्यानंतर दिवस आणि रात्र समान वेळ असेल. या अवस्थेला Winter Solstice म्हणतात. Solstice हा लॅटिन शब्द आहे जो Solstim वरून आला आहे. लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणे. या नैसर्गिक बदलामुळे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.
इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. हिवाळ्यात दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश जास्त असतो. तर उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. यामुळे तिथे दिवसाची वेळ ही कमी असते.