फायद्याचा कायदा... इथे हँगओव्हरसाठीही मिळू शकते सुट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:18 PM2019-11-07T12:18:17+5:302019-11-07T12:20:40+5:30
कल्पना करा की, ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही बॉसला सांगितले की, घशात खवखव असल्याने मला सुट्टी हवी आहे. यावर इतक्या शिव्या मिळण्याची शक्यता असते की, कानातून जाळ निघावा.
(Image Credit : killcliff.com)
कल्पना करा की, ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही बॉसला सांगितले की, घशात खवखव असल्याने मला सुट्टी हवी आहे. यावर इतक्या शिव्या मिळण्याची शक्यता असते की, कानातून जाळ निघावा. पण तेच जर तुम्हाला हॅंगओव्हरसाठी आनंदाने सुट्टी मिळाली तर....? तुम्ही म्हणाल काय गंमत लावली राव....पण हे प्रत्यक्षात होणार आहे. पण भारतात नाही तर जर्मनीमध्ये.
जर्मनीमध्ये हॅंगओव्हर हा आजार असल्याचं ऑफिशिअली घोषित केलं आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी हॅंगओव्हरसाठी सुट्टी मिळू शकणार आहे. रात्रभर तुम्ही दारू ढोसत बसले असाल तर सकाळी डोकं पकडलेलं असतं, अशात ऑफिसमध्ये जाणं फारच शौर्याचं काम ठरतं. भारतात बॉसला सांगाल की, हॅंगओव्हर आहे ऑफिसला येऊ शकत नाही. तर बॉस हेच म्हणेल की, रात्रभर बोंबलत पार्टी केली आणि सकाळी सकाळी नाटक करतोय. जर रात्री पार्टी केलीही असेल पण सकाळी डोकं दुखत आहेच. म्हणजे डोकेदुखी हे अस्वस्थ व्यक्तीचं लक्षण आहे.
आपल्याकडे तर सर्दी-पळस्याला आजारच समजलं जात नाही. बॉस यावर फार फार तर 'काळजी घे' असं म्हणतील. पण सुट्टीची काही अपेक्षा ठेवू नका. आता हेच बघा ना तापही १०२ च्या वर असेल तरच ताप ताप मानला जातो. इतका ताप नसेल तर तो ताप मानला जात नाही.
आता समजा एखाद्याचं ब्रेकअप झालं तर तो काम करण्याच्या मानसिक स्थितीत नसेल. म्हणजे ती व्यक्ती मानसिक स्थिर नाही. आता त्याचं ब्रेकअप झालंय म्हणजे तो गममध्ये ड्रिंक करणार तर त्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार. पण हे भारतात कधी होणार माहीत नाही. पण जर्मनीत हॅंगओव्हरची सुट्टी मिळू शकते.
हा निर्णय कोर्टाने एका खटल्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान दिलाय. मद्यसेवन केल्यावर होणारं हॅंगओव्हर हा एक आजारच आहे. कोर्टाने हा निर्णय हॅंगओव्हर दूर करण्यासाठी पेय तयार करणाऱ्या कंपनी विरोधात सुनावला आहे. ही कंपनी हॅंगओवर एक आजार सांगून यावर उपचार करणारं 'एक अॅंटी हॅंगओव्हर ड्रिंक' विकत होती. आता कोर्टाच्या निर्णयामुळे जर्मनीमध्ये ऑफिशिअली हॅंगओव्हर हा एक आजार आहे. त्यामुळे सुट्टी मिळण्यास अडचण येणार नाही. तसेच कोर्टाने या अॅंटी-हॅंगओव्हर पेयावर बंदी आणली आहे.