पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात सात पोत्यात भरून घेऊन गेला नाणी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:35 PM2023-06-20T14:35:29+5:302023-06-20T14:38:45+5:30
Jaipur : 12 वर्षाआधी दशरथ कुमावतचं लग्न सीमा कुमावतसोबत झालं होतं. पण गेल्या पाच वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सीमाने पती विरोधात हुड्यांसाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होती.
Jaipur : जयपूरच्या फॅमिली कोर्टातून एक अजब घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी त्रास देण्याच्या केसमध्ये कोर्टाने आरोपी पतीला तुरूंगात पाठवणे आणि पत्नीला पोटगी म्हणून 55 हजार रूपये देण्याचा आदेश दिला होता. यानंतर आरोपीच्या परिवाराने रक्कम जमा केली. पण ती 55 हजार रूपयांची रक्कम पाहून सगळेच हैराण झाले.
पतीने पोटगी म्हणून पत्नीला दिली जाणारी 55 हजार रूपयांच रक्कम पोत्यांमध्ये भरून आणली होती. आता कुणालाही प्रश्न पडेल की, 55 हजार रूपयांसाठी पोती कशाला लागतील? झालं असं की, पतीने 55 हजार रूपयांची नाणी जमा केली आणि या नाण्यांचं वजन साधारण 280 किलो होतं. त्यामुळे त्यांना ही नाणी पोत्यात भरून आणावी लागली. पोत्यांमधून जेव्हा नाण्यांची खणखण ऐकून आली तेव्हा सगळेच हैराण झाले. 7 कट्ट्यांमध्ये 1, 2, 5 आणि 10 रूपयांची नाणी होती. नंतर कोर्टाने ही नाणी सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला.
12 वर्षाआधी दशरथ कुमावतचं लग्न सीमा कुमावतसोबत झालं होतं. पण गेल्या पाच वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सीमाने पती विरोधात हुड्यांसाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होती. याच केसच्या तारखा सुरू होत्या. पतीकडे 2.50 लाख रूपये भरपाई म्हणून मागण्यात आली आहे. अशात ही रक्कम देण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली आणि कोर्टात हजर केलं होतं.
दरम्यान कोर्टाने त्याला तुरूंगात पाठवण्यासोबतच पोटगीच्या रकमेचा पहिला टप्पा भरण्याचा आदेश दिला. दशरत कुमावत तुरूंगात असल्याने त्याच्या परिवाराने 55 हजार रूपयांची नाणी जमा केली. अजून त्याला 1.70 लाख रूपये पत्नीला द्यायचे आहेत.
दुसरीकडे 55 हजार रूपयांनी नाणी दिल्यानंतर सीमा कुमावतचे वकिल रामप्रकाश कुमावत म्हणाले की, हे सगळं तिला त्रास देण्यासाठी केलं जात आहे. हे अमानवीय आहे. नाणी पाहिल्यावर कोर्टानेही सांगितलं की, ही नाणी मोजण्यासाठी 10 दिवस लागतील. आता इतकी नाणी सुरक्षित कशी ठेवावी म्हणून कोर्टाने ही नाणी 1-1 हजारात विभागण्यात सांगितली.