ऐकावं ते नवलच! 'या' गावात दोन लग्न करायची आहे पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 11:21 AM2018-05-21T11:21:49+5:302018-05-21T11:21:49+5:30

पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला तर त्या पुरूषाला दुसरं लग्न करावं लागत.

in this jaisalmer village a man in every second house has two wifes | ऐकावं ते नवलच! 'या' गावात दोन लग्न करायची आहे पद्धत

ऐकावं ते नवलच! 'या' गावात दोन लग्न करायची आहे पद्धत

Next

जैसलमेर- राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एक गाव असं आहे जिथे दोन पत्नी ठेवण्याची पद्धत आहे. जैसलमेरमधील डेरासर ग्रामपंचायतीच्या 'रामदेयो की बस्ती' नावाच्या गावात प्रत्येक दुसऱ्या घरात एका पुरूषाने दोन लग्न केलेली आहेत. 

त्या गावातील पुरूषांनी दोन लग्न केली आहेत व ते दोन पत्नींच्याबरोबरच राहतात. पहिल्या पत्नीला जर गर्भधारणा झाली नाही किंवा पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला तर त्या पुरूषाला दुसरं लग्न करावं लागत, असा दावा त्या गावातील पुरुषांनी केला आहे. सध्या त्या गावातील जुन्या पीढीमध्ये ही पद्धत असून नवीन पीढीमध्ये ही पद्धत नाही. 

दुसरी पत्नीचं मुलाला जन्म देऊ शकते, या विचाराने गावातील लोकांच्या मनात घर केलं आहे. दुसरी पत्नी मुलाला जन्म देणारच याच खात्रीने दुसऱ्या पत्नीकडे पाहिलं जातं. दोन पत्नी असताना घरात एकजुट राहावी यासाठी स्वयंपाक घरात एकत्र जेवण बनवलं जातं. 
जैसलमेर आणि बाडमेरच्या काही भागात दोन पत्नी असण्याची ही परंपरा चालते. पण काळाच्या ओघात ही पद्धत नाहीशी होत जाते आहे पण 'रामदेयो की बस्ती' या गावातील जुन्या पीढीने अजूनही ही पद्धत सुरू ठेवली आहे. गावातील मौलवी निशरू खान यांच्या दोन भावांनीही दोन-दोन लग्न केली आहेत. 
 

Web Title: in this jaisalmer village a man in every second house has two wifes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.