"साहेब, माझे कुटुंबीय माझं लग्न करत नाहीत त्यामुळे मी वेडा होतोय"; तरुणाची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:58 PM2022-11-23T15:58:25+5:302022-11-23T16:03:34+5:30

"साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.

jalaun man reaches orai police station requests- for marriage to police | "साहेब, माझे कुटुंबीय माझं लग्न करत नाहीत त्यामुळे मी वेडा होतोय"; तरुणाची पोलिसात धाव

"साहेब, माझे कुटुंबीय माझं लग्न करत नाहीत त्यामुळे मी वेडा होतोय"; तरुणाची पोलिसात धाव

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील माझं लग्न करू देत नाहीत अशी तक्रार एका 30 वर्षीय तरुणाने केली आहे. "साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची तक्रार ऐकून सर्वच जण आधी हैराण झाले. 

पोलीस कर्मचारी त्याच्यावर हसले. वरिष्ठांना अर्ज देऊन आपलं लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालौन तालुक्यातील शेखपूर गावातील रहिवासी शाहिद शाह यांचा मुलगा मिठ्ठू लग्नासाठी अर्ज घेऊन उराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. अरविंद यादव यांना अर्ज दिला. अर्ज देताना त्यानं सांगितलं की, त्याचं वय 30वर्षे आहे. मात्र, अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे तो आयुष्य जगण्याच्या हक्कापासून वंचित राहत आहे. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहे. 

घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजूनही त्याच्या लग्नाचा विचार केलेला नाही. त्यामुळेच तो मानसिकदृष्ट्या जास्त अस्वस्थ होत आहे. जर त्याचं लग्न झाले नाही तर तो वेडा होईल. लग्नानंतर तो आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवेल. शिवाय, लग्न करून दिल्याबद्दल तो पोलिसांचा सदैव ऋणी राहीन, असंही मिठूने सांगितलं.

मिठूचा विनंती अर्ज पोलीस स्टेशनमध्ये येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी निरीक्षकांनी त्याचा अर्ज वाचला. बसवून त्याच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर आणि लग्न लावून देण्याचं आश्वासनही दिलं. अर्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या नातेवाईकांनाही बोलावलं. दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: jalaun man reaches orai police station requests- for marriage to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.