४ धामांपैकी १; श्रीकृष्णाच्या माहालावरचं २ हजार वर्ष जुनं मंदिर माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 03:29 PM2020-08-11T15:29:23+5:302020-08-11T17:16:40+5:30
हिंदू धर्मात मानल्या जात असलेल्या चार धाम पैकी एक धाम म्हणजे हे मंदीर आहे.
देशाच्या विविध भागात आज गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतांनुसार आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश मंदिराबाबत सांगणार आहोत. हिंदू धर्मात मानल्या जात असलेल्या चार धाम पैकी एक धाम म्हणजे हे मंदीर आहे. पौराणिक कथांनुसार जवळपास ५ हजार वर्ष आधी भगवान श्रीकृष्णांनी द्वारका नगरी तयार केली होती. श्रीकृष्णाचा खासगी महल हरी गृहावर द्वारकाधिश मंदिर निर्माण झालं आहे. द्वारकाधीश मंदिरात भगवान श्रीकृष्णांची श्यामवर्णी चतुर्भुज प्रतिमा आहे.
ही प्रतिमा चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या प्रतिमेत श्रीकृष्णाच्या हातात शंख, गदा, चक्र आणि कमळ आहे. पुरात्त्व संशोधनादरम्यान २००० ते २, २०० वर्षांपूर्वीचे हे मंदीर असल्याचे सांगितले जात आहे. चूना आणि दगडांपासून तयार झालेले हे मंदीर ७ मजल्यांचे असून जवळपास १५७ फूट उंच आहे.
श्रीकृष्णाच्या जीवनाचे चित्रण या प्रतिमांच्या माध्यामातून करण्यात आले आहे. दक्षिणेकडच्या दरवाज्याला स्वर्गद्वार असे म्हटले जाते. दर्शनाला येणारे भक्तगण या दरवाज्याच्या माध्यामातून मंदिरात प्रवेश करतात. उत्तरेकडील दरवाज्याला मोक्षद्वार असं म्हणतात. हे द्वार गोमती नदीपर्यंत नेणारं आहे.
मंदिराच्या दक्षिणेला भगवान त्रिविक्रम यांचे मंदीर आहे. राजा बली आणि चारही कुमारांच्या मुर्ती असून गरूडाची मुर्तीसुद्धा या ठिकाणी विराजमान आहे. उत्तरेला प्रधुम्न, अनिरुद्ध व बलदेव यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या पूर्वेला दुर्वासा ऋषींचे मंदिर आहे. मोक्ष दालनाजवळ कुशेश्वर शिव मंदिर आहे. या ठिकाणचे दर्शन केल्याशिवाय यात्रा अपूर्ण आहे ,असं मानलं जातं.
हे पण वाचा :
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!
शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल