Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:11 AM2023-01-12T10:11:44+5:302023-01-12T10:12:44+5:30

Japan Johatsu Tradition: जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत.

Japan Johatsu Tradition : when people mysteriously vanished leaving everything behind like vapour | Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

googlenewsNext

(Image Credit : www.businessinsider.in)

Japan Johatsu Tradition: भारतात लोक अनेकदा जीवनाला कंटाळून हिमालयात निघून जाण्याबाबत बोलतात. कारण तिथे त्यांना कुणी ओळखणार नाही आणि त्यांना शांततेने जगता येईल. पण एक देश असाही आहे जिथे भारतातील ही थीम अनेक दशकांपासून फॉलो केली जाते. हा देश म्हणजे जपान. इथे घर सोडून गायब होणाऱ्या लोकांना जोहात्सु असं म्हटलं जातं

जोहात्सुचा अर्थ

जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत. ते त्यांच्या जीवाला नुकसान पोहोचवण्याऐवजी एक नव्या जीवनाची सुरूवात करतात. या कामासाठी तर आता काही प्रायव्हेट कंपन्याही मदत करतात. ज्या एक ठराविक रक्कम घेऊन लोकांना वाफेसारखं गायब होण्यास मदत करतात.

ते परत येत नाहीत

अशात हे स्पष्ट आहे की, जोहात्सु म्हणजे जे लोक घरातून नोकरी किंवा दुकानासाठी बाहेर पडले ते घरी परत आलेच नाहीत. याच गायब होणाऱ्या लोकांना जोहात्सु असं म्हणतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये बघण्यात आलं की, कुटुंबियांनी खूप शोध घेऊनही या लोकांचा काही पत्ता लागत नाही. लोक असे अचानक होण्यामागच्या कारणांमध्ये परिवारातील लोक, नोकरीतील तणाव किंवा कर्ज असतं. अशा स्थितींमध्ये लोक गायब होण्याचा निर्णय घेतात.

कारण नेहमी नकारात्मक नसतं

या कामाला प्रोफेशन बनवणाऱ्या लोकांनी सांगितलं की, लोकांचं गायब होण्याचं कारण नेहमी नकारात्मक नसतं. अनेक लोक नवीन नोकरी सुरू करण्यासाठी किंवा नवीन लग्न करण्यासाठीही असं करतात. एका जपानी वेबसाइटवर प्रकाशित रिपोर्टनुसार, जोहात्सुवर अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे अभ्यासक हिरोकी नाकामोरिक म्हणाले की, या शब्दाचा वापर गायब होणाऱ्या लोकांसाठी पहिल्यांदा 1960च्या दशकात वापरला गेला होता.
जपानी एक्सपर्ट्स सांगतात की, त्यांच्या देशात घटस्फोट कमी होण्यामागचं कारणही जोहात्सु आहे. कारण बरेच लोक इथे घटस्फोटाची कायदेशीर कारवाई करण्याऐवजी जोहात्सु बननं अधिक पसंत करतात.

ही कॉन्सेप्ट यशस्वी होण्याचं कारण हेही आहे की, जपानमध्ये प्रायव्हसीबाबत फार कठोर कायदे आहेत. इथे पोलीस बेपत्ता व्यक्तीचा तोपर्यंत शोध घेत नाहीत जोपर्यंत त्या व्यक्तीवर एखादा गुन्हा किंवा दुर्घटनेत असल्याचा संशय नसतो. अशात बेपत्ता व्यक्ती आपल्या एटीएममधून पैसे काढू शकतो. आपल्या जीवनातील सगळी कामे सहजपणे करू शकतो. जेव्हा कायदा मदत करू शकत नाही तेव्हा बेपत्ता व्यक्तीच्या परिवारातील लोक प्रायव्हेट डिटेक्टीवची मदत घेतात. त्यामुळे इथे डिटेक्टिव एजन्सींची संख्या आजूबाजूच्या देशांपेक्षा जास्त आहे.

Web Title: Japan Johatsu Tradition : when people mysteriously vanished leaving everything behind like vapour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.