मनुष्य जीवनाला 'कंटाळला', इतके लाख रूपये खर्च करून बनला 'कोल्हा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:13 AM2023-08-03T10:13:08+5:302023-08-03T10:18:02+5:30
जानेवारी 2023 मध्ये टोरूकडे हा खास सूट आला. टोरू नंतर हा सूट घालून राहत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार सात आठवडे आणि चार लोकांद्वारे हा सूट बनवण्यात आला.
जगात असे बरेच लोक आहेत ज्यांचं प्राण्यांवर खूप प्रेम असतं. काही लोक तर प्राण्यांवर मनुष्यांपेक्षा जास्त प्रेम करतात. जपानमधील एका व्यक्तीचं कोल्ह्यावर इतकं प्रेम होतं की, तो स्वत:च आता कोल्हा बनलाय. या व्यक्तीने 3 मिलियन म्हणजे 17.29 लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च करून कोल्ह्यासारखा सूट बनवून घेतला. या व्यक्तीने दावा केला की, हा सूट घातल्यानंतर त्याला मनुष्यासारखं वाटत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार जपानचा इंजीनिअर, टोरू उएदा (Toru Ueda) कदाचित मनुष्याचं जीवन जगता जगता कंटाळला होता. त्याने 3 मिलियन येन म्हणजेच 17.29 लाख रूपये खर्च केले आणि त्याने त्याच्यासाठी हॅंडसम वुल्फ म्हणजे कोल्ह्याचा सूट बनवला.
जानेवारी 2023 मध्ये टोरूकडे हा खास सूट आला. टोरू नंतर हा सूट घालून राहत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार सात आठवडे आणि चार लोकांद्वारे हा सूट बनवण्यात आला. टोरू सार्वजिनक ठिकाणांवर हा सूट घालून जात नाही.
32 वर्षीय टोरूचा दावा आहे की, तो घरीच हा सूट घालून असतो. टोरूने जानेवारी 2023 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हाही तो हा सूट घालतो तेव्हा त्याला तो मनुष्य असल्याचं अजिबात वाटत नाही. हा सूट घालून तो त्याच्या सगळ्या समस्या विसरून जातो.
टोरू म्हणाला की, कोल्ह्याचा हा सूट घालून तो जेव्हा स्वत:ला आरशात बघतो तेव्हा त्याला एक कोल्हा दिसतो. टोरूसाठी हा अनुभव फारच खास आहे.
जपानमधील एक व्यक्ती बनला श्वान
ज़ेपेट वर्कशॉपने जपानमधील एका दुसऱ्या व्यक्तीसाठी श्वानाचा सूट डिझाइन केला होता. 11 लाख रूपये खर्च करून या व्यक्तीने Collie नावाच्या हायब्रिड प्रजातीच्या श्वानाचा सूट बनवला होता.