एक अशी परंपरा ज्यात कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात करावी लागते आंघोळ, बघूनच भरेल हुडहुडी....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:23 AM2023-01-17T10:23:09+5:302023-01-17T10:25:15+5:30
Japan’s Shinto Festival Ice Bath: हिवाळ्यात तसे लोक थंड पाण्याला हात लावण्यासही घाबरतात. पण जपानमध्ये एक अशी परंपरा आहे ज्यात लोक कडाक्याच्या थंडीत आइस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात.
Japan’s Shinto Festival Ice Bath: जगभरात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहेत. ज्यांबाबत समजल्यावर लोक हैराण होतात. यातील काही परंपरा आपल्याला समजतात, पण काही अजिबातच समजत नाहीत. स्थानिक लोक या परंपरा पूर्ण श्रद्धेने फॉलो करतात. अशीच एक अनोखी परंपरा जपानमध्ये आहे. ज्याबाबत वाचून लोकांना हुडहुडी भरते. हिवाळ्यात तसे लोक थंड पाण्याला हात लावण्यासही घाबरतात. पण जपानमध्ये एक अशी परंपरा आहे ज्यात लोक कडाक्याच्या थंडीत आइस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात.
जपानमध्ये शिंटो परंपरा आहे. ज्यात लोक पांढरे कपडे घालून बर्फाच्या पाण्यात बसतात आणि जप करतात. जपानमध्ये 14 जानेवारीला काही पुरूष आणि महिलांचा समूह आपली आत्मा शुद्ध करण्यासाठी आणि नवीन वर्षात चांगलं होऊ दे याची प्रार्थना करण्यासाठी थंड पाण्यात आंघोळ करतात.
डेली मेलनुसार, भाविक टोकियोतील कांडा मायोजिन मंदिरात थंड पाण्यात आंघोळ करण्यासाठी जमा झाले होते. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात काही पुरूष लंगोट बांधून तर काही महिला पांढरे कपडे घालून एका थंडी पाण्याच्या टबमध्ये आहेत.
दोन दिवसीय शिंटो फेस्टिवलमध्ये भाविक आपल्या अंगावर पाणी टाकण्याआधी मंदिरासमोर प्रार्थना करतात. भाविकांना एकूण सहा मिनिटे थंड पाण्यात रहावं लागतं. या फेस्टिवलमध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेतला. इथे दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी या फेस्टिवलचं आयोजन केलं जातं.