समुद्राच्या आत सापडलं अजब पिरॅमिड, 10 हजार वर्ष जुन्या या इमारतीचं रहस्य अजूनही कोड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:09 AM2023-12-22T11:09:20+5:302023-12-22T11:14:23+5:30
यात सगळ्यात जास्त हैराण करणारं म्हणजे येथील पिरॅमिड. त्याशिवाय आणखीही काही इमारती ज्या मंदिर, स्टेडिअमसारख्या दिसतात.
जपानच्या योगागुनि बेटावर पाण्याच्या आत पिरॅमिडचे अवशेष मिळाल्याची घटना समोर आली आहे. पण हे पिरॅमिड इथे आलं कसं? यामागे काय रहस्य आहे? काही रिपोर्टनुसार, एक्सपर्ट्सचं मत आहे की, इथे 10 हजार वर्षांआधी एक शहर होतं. जे लुप्त झालेल्या सभ्यतेने वसवलं होतं. त्याचेच अवशेष आज पाण्याखाली आहेत. यात सगळ्यात जास्त हैराण करणारं म्हणजे येथील पिरॅमिड. त्याशिवाय आणखीही काही इमारती ज्या मंदिर, स्टेडिअमसारख्या दिसतात.
इंडिपेंडेंट यूकेच्या रिपोर्टनुसार, समुद्राचे अभ्यासक मसाकी किमुरा यांनी 2007 मध्ये नॅशनल जिओग्राफिकला सांगितलं होतं की, 'येथील सगळ्या मोठी इमारत एका पिरॅमिडसारखी दिसते. जी 25 मीटर खोलातून वर येत आहे'. त्यावेळी किमुरा 15 वर्षापासून या वास्तूच्या संरचेनेची मॅपिंग करत होते आणि जेव्हा जेव्हा ते बघण्यासाठी पाण्यात जात होते तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता की, ही इमारत एका प्राचीन शहराचा भाग आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, त्यांचं आणि काही इतर लोकांचं मत होतं की, ही इमारत देशातील जोमोन लोकांनी बनवली असेल. हे लोक शिकार करत होते. ते 12000 ईसपू मध्ये बेटावर राहत होते.
हे ठिकाण चांगल्या प्रकारे बघणारे बोस्ट यूनिवर्सिटीचे प्रोफेसर रॉबर्ट स्कोच म्हणाले की, योगागुनी स्मारक हे अजिबात मानव निर्मित नाहीये. दोन्ही एक्सपर्टने केलेल्या या दाव्यांना आता 16 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. तेच पाण्याखालील हे शहर सापडण्यास 37 वर्ष झाली आहे. पण अजूनही याची निर्मिती कशी झाली हे एक रहस्य बनून आहे. 1986 मध्ये एका व्यक्तीला पाण्याखाली हे पिरॅमिड दिसलं होतं.
तेव्हापासून हे पृथ्वीवर बनण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत.
किमुरा यांनी सांगितलं की, 1771 मध्ये एक त्सुनामी आली होती. ज्याच्या लाटा 40 मीटर उंच म्हणजे 131 फूट उंच होत्या. यामुळे योगागुनी बेट आणि आजूबाजूचा परिसर प्रभावित झाला होता. या घटनेत 12 हजार लोक मृत्यू झाले किंवा बेपत्ता झाले.