बाबो! त्याच्यासोबत चंद्रावर जाण्यासाठी तयार झाल्या तब्बल २० हजार गर्लफ्रेन्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:35 PM2020-01-17T12:35:09+5:302020-01-17T12:39:24+5:30
यासाठी त्याने काही अटीही ठेवल्या आहेत. त्या अटींनुसार, पार्टनरचं वय २० असावं. त्या व्यक्तीला स्पेसमध्ये प्रवास करण्याची आवडही असावी.
(Image Credit : publicdomainpictures.net)
जपानचा फॅशन टायकून युसाकू माएजावासोबत चंद्रावर जाण्यासाठी तब्बल २० हजार गर्लफ्रेन्ड्सनी तयारी दर्शवली आहे. १२ जानेवारील युसाकूने ऑनलाइन ओपन अॅप्लिकेशन काढलं होतं. ज्यात त्याच्यासोबत चंद्रावर जाण्यासाठी तो एका गर्लफ्रेन्डच्या शोधात होता.
युसाकूने दिलेली ही ऑफर स्वीकारण्यास आतापर्यंत २० हजारपेक्षा अधिक मुलींनी अर्ज केलाय. एलन मस्कच्या प्रोजेक्ट SpaceX ची पहिली कमर्शिअल स्पेसफ्लाइटसाठी त्याला एका महिला पार्टनरचा शोध होता. ही ट्रिप २०२३ मध्ये होणार आहे. युसाकून स्टारशिप रॉकेटवर चंद्राजवळून प्रवास करणारे ते पहिले सर्वसामान्य व्यक्ती ठरतील. युसाकू माएजावा जपानमधील १८वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २००४ मध्ये त्यांनी एक फॅशन वेबसाइट लॉन्च केली होती.
रिअॅलिटी शोमधून रिलेक्ट होईल पार्टनर
युसाकू एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून पार्टनरची निवड करणार आहे. यासाठी त्याने काही अटीही ठेवल्या आहेत. त्या अटींनुसार, पार्टनरचं वय २० असावं. त्या व्यक्तीला स्पेसमध्ये प्रवास करण्याची आवडही असावी.
युसाकूचं वय ४४ असून स्पेसक्राफ्टच्या अनेक सीटचं तिकीट त्याने खरेदी केलं आहे. तो त्याच्यासोबत इतरही काही लोकांना नेणार आहे. यातील एक सीट युसाकूला त्याच्या पार्टनरसाठी ठेवायची आहे. मार्च महिन्यात युसाकू त्याच्या पार्टनरची निवड करणार आहे.