लोकांच्या ज्यूसमध्ये आपलं रक्त मिक्स करत होती वेटर, सत्य समोर येताच गेली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:11 PM2023-05-19T17:11:40+5:302023-05-19T17:12:00+5:30

जपानच्या साप्पोरो येथील या कॅफेची नुकतीच चर्चा झाली. ही चर्चा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नाही तर वेटरच्या कारनाम्यामुळे झाली होती.

Japanese cafe waitress mixes own blood in people drink got fired | लोकांच्या ज्यूसमध्ये आपलं रक्त मिक्स करत होती वेटर, सत्य समोर येताच गेली नोकरी

लोकांच्या ज्यूसमध्ये आपलं रक्त मिक्स करत होती वेटर, सत्य समोर येताच गेली नोकरी

googlenewsNext

ब्लड मेरीबाबत तुम्ही ऐकलं असेलच. कथांनुसार, या महिलेला अनेकदा आवाज दिल्यावर ती आरशात दिसत होती. ही तर झाली कथा. जर रिअल लाइफमध्ये सांगायचं तर ब्लड मॅरी एक ड्रिंक आहे. जे अनेक गोष्टींपासून तयार केलं जातं. यात टोमॅटो, वोडका आणि काही मसाल्यांचा समावेश असतो. याची टेस्ट वाढवण्यासाठी यात अनेक जडीबुटी टाकल्या जातात. जपानमध्ये काम करणारी एक वेटर या ड्रिंकमध्ये तिचं रक्त मिक्स करून प्यायला देत होती.

जपानच्या साप्पोरो येथील या कॅफेची नुकतीच चर्चा झाली. ही चर्चा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नाही तर वेटरच्या कारनाम्यामुळे झाली होती. इथे काम करणारी वेट्रेस इथे येणाऱ्या लोकांच्या ड्रिंकमध्ये तिचं रक्त मिक्स करत होती. हे कुणालाच माहीत नसल्याने लोकही मोठ्या आवडीने ड्रिंक पित होते. जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा लोक संतापले. 

जेव्हा कॅफेला याबाबत समजलं तेव्हा त्यांनी लगेच वेट्रेसला लगेच नोकरीवरून काढलं. इतकंच नाही तर तिच्या या कृत्याला पार्ट टाइम टेररिज्म घोषित करण्यात आलं. सोबतच सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करून आपल्या ग्राहकांची माफीही मागितली. हा कॅफे काही साधारण कॅफे नाही. याचं नाव Mondaiji आहे. ज्याचा इंग्रजीतील अर्थ असा होतो की, असा कॅफे जो गरजू मुले चालवतात. या कॅफेमध्ये ग्राहकांची सेवा अशी मुलं करतात जे काही समस्यांमधून काढण्यात आले.

ज्या वेट्रेस हा आरोप लावण्यात आला आहे तिलाही रेस्क्यू करण्यात आलं होतं. कॅफेमध्ये काम करून मेहनतीचे पैसे देऊन तिची मदत केली जात होती. पण या मुलीने लोकांनी ड्रिंकमधून तिचं रक्त पिण्यास दिलं. ती सामान्यपणे orikaru नावाच्या ड्रिंकमध्ये तिचं रक्त टाकत होती. यात वेगवेगळी फळं आणि कलर सिरपचा वापर होता होता. ही घटना समोर आल्यावर काही दिवस कॅफे बंद होता. जेणेकरून भांडी बदलली जावी.
 

Web Title: Japanese cafe waitress mixes own blood in people drink got fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.