जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:02 PM2021-04-12T16:02:37+5:302021-04-12T16:15:53+5:30
हे नेते जॅकेट्सच्या माध्यमातू प्रेग्नेन्सीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग ताकाको सुझुकी नावाच्या महिला नेत्याने ऑर्गनाइज केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील तीन नेते एक जड जॅकेट घालून सगळीकडे फिरत आहेत. ७.५ किलो वजनाचं हे जॅकेट घालून ते कामावर जातात. शॉपिंगला जातात आणि घरातील कामही करतात. त्यांना हे जॅकेट काढण्याची संधी केवळ अधिवेशन सेशनदरम्यानच मिळते.
हे नेते जॅकेट्सच्या माध्यमातू प्रेग्नेन्सीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग ताकाको सुझुकी नावाच्या महिला नेत्याने ऑर्गनाइज केला आहे. या प्रयोगाच्या आधारे ते पुरूष राजकीय नेत्यांना प्रेग्नेन्सीच्या अडचणी आणि आव्हानांना समजून घेण्यात मदत करत आहेत.
जगातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जपानमध्येही प्रेग्नेन्ट महिलांची वर्कप्लेसवर फार काळजी घेतली जात नाही. ओसाकामध्ये राहणाऱ्या एका महिलेने वाइस वर्ल्ड न्यूजला सांगितले की, आपल्या प्रेग्नेन्सीच्या सुरूवातीच्या काळात ती फार त्रासलेली होती आणि तिला असं वाटत होतं की, तिचं मिसकॅरेज होईल. इतक्या अडचणी असूनही ती बॉसकडून सुट्टी मागण्याची हिंमत करू शकली नव्हती.
मसनओबून ओगुरा नावाच्या जपानी नेत्याने ट्विटरवर लिहिले की, या एक्सपरिमेंटच्या आधारे मला गर्भवती महिलांच्या काही अडचणी समजून आल्या. आणि आमचा प्रयत्न हा असेल की, आम्ही त्यांच्या अडचणींना दूर करू शकू. तेच याप्रकरणी करिअर कंसल्टंट असाको निहारा म्हणाले की, जर जपानचे राजनेता या महिलांच्या सपोर्टसाठी नवीन पॉलिसी बनवत नाही तर हा प्रयोग केवळ एक परफॉर्मन्ससारखा होईल. याने महिलांच्या स्थितीत खास फरक पडणार नाही.
वाइस न्यूजसोबत बोलताना ते म्हणाले की, जपानमध्ये अनेक गर्भवती महिला आहेत ज्या ठीकपणे खाऊ शकत नाहीत आणि त्यांना चांगल्या संपोर्टची गरज असते. या सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ या प्रयोगात भाग घेऊ नये तर त्यांनी महिलांना शक्य ती मदत केली पाहिजे. तेच याबाबत एक महिला म्हणाली की, या जॅकेट्सची तुलना कोणत्याही प्रकारे प्रेग्नेन्सीसोबत केली जाऊ शकत नाही. पण या प्रयोगानंतर नेते अशा काही पॉलिसी आणतील ज्यात चाइल्डकेअर, वुमेन करिअर आणि लैगिक भेदभाव यावर बोललं जाईल. कारण याबाबती आम्ही अनेक देशांच्या मागे आहोत.