व्यक्तीला लागली होती महिलांचे रेनकोट चोरण्याची चटक, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 02:12 PM2022-10-01T14:12:32+5:302022-10-01T14:14:48+5:30
जपानच्या एका व्यक्तीने असं काही केलं जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सध्या जपानमध्ये एका व्यक्तीची खूपच चर्चा होत आहे.
जगात अनेक अजब लोक असतात. त्यांचे कारनामे ऐकून हैराण व्हायला होतं. काही लोकांना वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याची आवड असते. पण जपानच्या एका व्यक्तीने असं काही केलं जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सध्या जपानमध्ये एका व्यक्तीची खूपच चर्चा होत आहे. कारण त्याला पुरूषांचे नाही तर महिलांचे रेनकोट चोरण्याची सनक होती.
ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, योशीदो योदा (Yoshido Yoda) 51 वयाचा आहे. त्याला नुकतीच जपानच्या ओसाका पोलिसांनी अटक केली. त्याला गुन्हा हा होता की, गेल्या 13 वर्षापासून तो महिलांचे रेनकोट चोरी करत होता. गेल्या 10 वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला रेनकोट मॅन असं नाव दिलं होतं.
रिपोर्टनुसार, योशीदो घरांमध्ये न्यूजपेपर देण्याचं काम करत होता. त्याची अचानक कप्पा जमा करण्याची इच्छा झाली. कप्पा एकप्रकारचा जपानी कपडा आहे जो प्लास्टिकपासून तयार होतो आणि कप्पा कपड्यांच्या वरून घातला जातो. जेणेकरून पाऊस लागू नये. पोलिसांनी सांगितलं की, तो 2009 सालापासून रेनकोट चोरी करत होता. जेव्हा योशीदोच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तिथे 360 रेनकोट सापडले. ज्यातील साधारण 20 रेनकोन गेल्या 10 वर्षात चोरी केले.
काय होतं हे करण्याचं कारण
पोलिसांनी चोराच्या चोरी करण्याच्या पद्धतीचा खुलासा केला. योशीदो नेहमीच सायकलवरून जात असलेल्या महिलांचा पाठलाग करत होता. किंवा अशा सायकल किंवा बाइकचा शोध होत ज्या महिलांच्या असतील. मग त्यांचे कपडे बघायचा, त्यात रेनकोट दिसला तर लगेच चोरी करायचा. त्याला पोलिसांनी याचं कारण विचारलं तर तो म्हणाला की, जसे इतर पुरूष महिलांचे अंडरगारमेंट्स बघून आकर्षित होतात, तसे त्याला महिलांचे रेनकोट बघणं आवडत होतं. याच कारणाने तो रेनकोट चोरी करत होता.