हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:30 PM2021-03-12T15:30:37+5:302021-03-12T15:47:46+5:30
यासुओ यांनी आपल्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायविंगचं लायसन्सही घेतलं आहे. ते गेल्या ७ वर्षांपासून एकटेच अंडरवॉटर डायविंग करत आहेत.
खरं प्रेम कशाला म्हणतात याचं एक उदाहरण सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. जपानमधील एक ६४ वर्षीय व्यक्ती गेल्या १० वर्षांपासून त्याच्या पत्नीचा शोध घेत आहे. यासुओ ताकामात्सु यांची पत्नी युको २०११ साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीपासून बेपत्ता आहेत. यासुओ यांनी आपल्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायविंगचं लायसन्सही घेतलं आहे. ते गेल्या ७ वर्षांपासून एकटेच अंडरवॉटर डायविंग करत आहेत. जेणेकरून पत्नीशी संबंधित एखादी वस्तू त्यांना मिळेल.
जपान प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून अडीच हजार लोक बेपत्ता असल्याने अंडवॉटर सर्च करत आहेत. यासुओ खाजगी पद्धतीने अंडरवॉटर डाइव करतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत दर महिन्याला संपर्क साधून त्यांच्या सर्च अभियानातही सहभागी होतात. आतापर्यंत या व्यक्तीने पाण्यात कपडे, अल्बमसारख्या वस्तू मिळवल्या आहेत. पण या वस्तू दुसऱ्यांच्या आहेत. त्यांना आतापर्यंत त्यांच्या पत्नीशी संबंधित एकही वस्तू सापडली नाही.
२०११ साली ७०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने १३३ फूट उंच लाटांनी जपानच्या उत्तरपूर्व कोस्टला दणका दिला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटचंही नुकसान झालं होतं. याला यूक्रेनमधील चेरनोबिलनंतरची सर्वात घातक न्यूक्लिअर दुर्घटना मानली जाते. या त्सुनामीत १५ हजार लोकांनी आपला जीव गमावला होता आणि २ लाख ३० हजार लोकांना आपली घरे सोडावी लागली होती.
जेव्हा ही त्सुनामी आली होती तेव्हा यासुओ आपल्या पत्नीबाबत चिंतेत नव्हते. कारण त्यांची पत्नी जिथे काम करत होती ते ठिकाणा डोंगराच्या मागे होतं. मात्र, बॅंकेच्या स्टाफने धोका लक्षात घेता सर्व बॅंक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं होतं. त्सुनामी तीव्रता वाढल्यावर बॅंकेचे काही कर्मचारी बुडाले होते. यासुओ यांच्या पत्नीचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही.
यासुओ यांनी त्यांचं आयुष्य पत्नीला शोधण्यात घालवलं आहे. ते म्हणाले की, त्यांना त्यांच्या पत्नीकडून जो शेवटचा मेसेज मिळाला होता त्यात ती म्हणाली होती की, बॅंकेच्या जॉबने थकले आहे आणि त्यांना घरी यायचं आहे. यासुओ यांना वाटतं की, त्यांच्या पत्नीला जपानमध्ये आलेल्या त्सुनामीच्या एक दशकाआधीच घरी परतायचं होतं. आणि हेच कारण आहे की, ते त्यांच्या पत्नीला शेवटच्या श्वासापर्यंत शोधणं कायम ठेवणार आहे.