सोन्याच्या बाथटबमध्ये आंघोळ करायचीय? तासाचा खर्च केवळ.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:32 PM2019-04-29T16:32:22+5:302019-04-29T16:48:20+5:30
भन्नाट प्रयोग जपानमधील एका रेस्टॉरन्टमध्ये करण्यात आला आहे. जपानमधील एक रेस्टॉरन्टमध्ये ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी चक्क सोन्याचा बाथटब तयार केला आहे.
रेस्टॉरन्ट मालक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि वेगळा अनुभव देण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लढवत असतात. असाच काहीसा भन्नाट प्रयोग जपानमधील एका रेस्टॉरन्टमध्ये करण्यात आला आहे. जपानमधील एक रेस्टॉरन्टमध्ये ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी चक्क सोन्याचा बाथटब तयार केला आहे. हा बाथटब १३० सेंटीमीटर रूंद आणि ५५ सेंटीमीटर खोल आहे. हा तयार करण्यासाठी साधारण १५४.२ किलोग्रॅम सोनं लागलं. यात एकाचवेळी दोन वयस्क व्यक्ती आरामात झोपून आंघोळ करू शकतात.
(Image Credit : nextshark.com)
हा बाथटब जपानच्या नागासाकी शहरातील जपान हॉट स्प्रींग रिसॉर्टमध्ये तयार करण्यात आला आहे. हा खास बाथटब तयार करणाऱ्या कंपनीनुसार, हा तयार करण्यासाठी साधारण ८ महिन्यांचा कालावधी लागला. तर याची एकूण किंमत ७.१५ मिलियन यूएस डॉलर म्हणजेच साधारण ५० कोटी रूपये आहे.
"金のお風呂"が #ギネス世界記録 に認定㊗️
— ギネス世界記録【公式】 (@GWRJapan) April 22, 2019
本日リニューアルされた「黄金と水素の湯 ハウステンボス温泉」にて認定された『最大の黄金風呂』が誕生‼🛁
職人が手作りしたバスタブは18金製。重さは154.2 kgもあります😆 pic.twitter.com/IEA8y8B1sE
हा बाथटब तयार करणारे हुईस टेन बॉच म्हणाले की, हा जगातला पहिला बाथटब आहे. आतापर्यंत कुणीही असा बाथटब तयार केला नाही. आम्हाला आशा आहे की, हा बाथटब ग्राहकांना एक वेगळा अनुभव देईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा बाथटब १८ कॅरेट सोन्याने तयार करण्यात आला आहे.
(Image Credit : nextshark.com)
सर्वात खास बाब म्हणजे ग्राहक हा बाथटब १ ते १० तासांसाठी भाड्याने घेऊ शकतील. यासाठी प्रतितासाच्या हिशेबाने पैसे घेतले जातील. या खास बाथटबमध्ये आंघोळ करण्यासाठी प्रति तासानुसार ५, ४०० येन म्हणजेच ४८ यूएस डॉलर द्यावे लागतील. भारतीय मुद्रेनुसार हा खर्च तीन हजार रूपयांपेक्षा अधिक होईल.
(Image Credit : nextshark.com)
रेस्टॉरन्टनुसार, हा बाथटब चीन आणि साउथ कोरियातील पर्यटकांना डोळ्यांसमोन ठेवू तयार करण्यात आला आहे. कारण तेथून येणारे पर्यटक खास बाथटबची मागणी करतात. या बाथटबची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.