'या' देशामध्ये पोलिस स्वच्छ गाड्यांवर मुद्दामुन फेकतात रंगांचे बॉल्स, कारण आहे धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:27 PM2022-07-31T17:27:56+5:302022-07-31T17:30:02+5:30

येथील पोलिसांनी एक नियम आपलासा केला आहे तो म्हणजे चांगल्या स्वच्छ चालत्या वाहनांवर हे पोलीस पेंट बॉल म्हणजे रंगाचे बॉल फेकतात. आपल्याकडे रंगपंचमी खेळताना रंगाचे फुगे फेकून मारले जातात ना तसाच हा प्रकार आहे.

japnees police throw color balls at car | 'या' देशामध्ये पोलिस स्वच्छ गाड्यांवर मुद्दामुन फेकतात रंगांचे बॉल्स, कारण आहे धक्कादायक

'या' देशामध्ये पोलिस स्वच्छ गाड्यांवर मुद्दामुन फेकतात रंगांचे बॉल्स, कारण आहे धक्कादायक

Next

जगात प्रत्येक देशाचे नियम आणि कायदे वेगळे आहेत आणि त्यामागे विविध कारणे आहेत. काही वेळा हे कायदे विचित्र वाटतात पण त्यामागचे कारण कळले कि आपोआप त्याची कारणमीमांसा कळते. जपान हा अनेक विचित्र चालीरिती असलेला देश असून त्याचे वर्णन ‘वंडरफुल जपान’ असेच केले जाते. येथील पोलिसांनी एक नियम आपलासा केला आहे तो म्हणजे चांगल्या स्वच्छ चालत्या वाहनांवर हे पोलीस पेंट बॉल म्हणजे रंगाचे बॉल फेकतात. आपल्याकडे रंगपंचमी खेळताना रंगाचे फुगे फेकून मारले जातात ना तसाच हा प्रकार आहे.

पण जपानी पोलिसांच्या या कृतीमागे काही कारण आहे. हा रंगाचा बॉल चालत्या वाहनावर फेकला कि फुटतो आणि त्यातील रंगाचे डाग वाहनावर पडतात. पोलिसांची ही कृती गुन्हेगार पकडण्यास उपयुक्त ठरते. म्हणजे समजा एखादा गुन्हेगार कार मधून चालला असल्याची खबर असेल तर त्याच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कार वर असे बॉल फेकले जातात किंवा एखादा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या वाहनावर सुद्धा असे बॉल फेकले जातात. या रंगांमुळे वाहनावर पडलेले डाग पुढच्या नाक्यावर असलेल्या पोलिसांना दुरुनही दिसतात आणि त्यांना गुन्हेगाराला पकडणे सोपे होते.

टोल गेट, पेट्रोल पंप अश्या ठिकाणी गुन्हे करून पलायन करणाऱ्या गुन्हेगारांसाठी ही शक्कल फार उपयुक्त ठरते असे सांगतात.

Web Title: japnees police throw color balls at car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.