Jara Hatke: अजबच! नॅनो कारपासून तयार केलं हेलिकॉप्टर, वरातीसाठी आतापर्यंत २० जणांनी केलं बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:59 PM2022-02-17T12:59:39+5:302022-02-17T13:01:10+5:30
Jara Hatke News: अनेकांना आपलं लग्न थाटामाटात लग्न व्हावं. अशी अनेकांची इच्छा असते. दरम्यान, लग्नातील वरातीला वेगळा लूक देण्यासाठी एका व्यापाऱ्याने नॅनो कारचं रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये केलं. या हेलिकॉप्टरमुळे वराची हेलिकॉप्टरमधून वरात नेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
पाटणा - अनेकांना आपलं लग्न थाटामाटात लग्न व्हावं. अशी अनेकांची इच्छा असते. दरम्यान, लग्नातील वरातीला वेगळा लूक देण्यासाठी एका व्यापाऱ्याने नॅनो कारचं रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये केलं. या हेलिकॉप्टरमुळे वराची हेलिकॉप्टरमधून वरात नेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील बगहामध्ये हे खास हेलिकॉप्टर तयार होत आहे. आतापर्यंत हे हेलिकॉप्टर पूर्णपणे तयार झालेले नाही. मात्र याचं बुकिंग आतापासून सुरू जाले आहे. या गाडीला हेलिकॉप्टरचे रूप देणाऱ्या कामगारांनी सांगितले की,विवाहामध्ये जाण्यासाठी आतापासून बुकिंग सुरू झालं आहे.
आतापर्यंत २० हून अधिक जणांनी या काररूपी हेलिकॉप्टरचे बुकिंग केले आहे. या गाडीला तयार करणाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अनेक असे विवाहसोहळे टीव्हीवर पाहिले आहेत. ज्यामध्ये नवरदेव हेलिकॉप्टरमधून पोहोचतो. ते वधूवरांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतात. तसेच नववधूला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घरी घेऊन जावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र महागाईमुळे त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत नाही, अशा परिस्थितीत या न उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून अशा नवरदेवांची इच्छा पूर्ण होणार आहे.
या हेलिकॉप्टरचे निर्माते गुड्डू शर्मा यांनी नॅनो कारला हेलिकॉप्टरचे रूप दिले. डिजिटल इंडियाच्या काळात हा प्रयोग आगळावेगळा आहे. हे हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या गुड्डी शर्मा यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. या गाडीला हायटेक लूक देण्यासाठी यामध्ये इलेक्ट्रिक सेंसर लावण्यात आले आहेत. यामध्ये लावण्यात आलेले पंखे आणि लाईट सर्व काही सेंसरद्वारे नियंत्रित होतात. तसेच हेलिकॉप्टरचा फॅनसुद्धा सेंसरच्या माध्यमातूनच नियंत्रित होतो. त्यामुळे ही कार खऱ्याखुऱ्या हेलिकॉप्टरप्रमाणे दिसते.