Jara Hatke: प्रायव्हेट जेटमधून प्रवास, लक्झरी कार, आता १२व्या वर्षी ती करोडपती मुलगी होणार निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:34 PM2023-07-26T15:34:15+5:302023-07-26T15:36:08+5:30
Jara Hatke: बारा वर्षांची मुलं सर्वसाधारणपणे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापतात. पार्टी करतात. मात्र एक ११ वर्षांची मुलगी पिक्सी कुटिस ही तिच्या बाराव्या वाढदिवशी निवृत्ती स्वीकारण्याची तयारी करत आहे.
बारा वर्षांची मुलं सर्वसाधारणपणे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापतात. पार्टी करतात. मात्र एक ११ वर्षांची मुलगी पिक्सी कुटिस ही तिच्या बाराव्या वाढदिवशी निवृत्ती स्वीकारण्याची तयारी करत आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. तसेच ही १२ वर्षांची मुलगी कोट्यधीश व्यावसायिक आहे.
ही छोटीशी व्यावसायिक असलेल्या पिक्सी हिची पीआर असलेली तिची आई रॉक्सी जेंकोसी हिच्या मते तिची मुलगी व्यवसायामुळे शाळेवर लक्ष देऊ शकत नाही आहे. तिने अभ्यासावर लक्ष द्यावं, असं तिला वाटते. त्यामुळे पिक्सी ही तिच्या कामाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत निवृत्तीचा विचार करत आहे. पिक्सी हिने व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. मात्र आता ती याच व्यवसायातून ब्रेक घेण्याचा विचार करत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेल्या पिक्सी हिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करताना तिच्या पार्टी प्लॅनिंगबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तिने काही गुडी बॅग दाखवल्या. त्या ती तिच्या नातेवाईकांना पार्टीमध्ये देईल. तसेच या बँगेमध्ये सुमारे चार हजार रुपयांचे प्रॉडक्ट असणार आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती गुडी बॅगमध्ये एक एक वस्तू ठेवताना दिसत आहे. यामध्ये दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे. पिक्सीच्या वाढदिवशी देण्यात येणऱ्या पार्टीचं नियोजन हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन पार्टी आणि वेडिंग प्लानर मेरी रोनिस इव्हेंट्कडून करण्यात येणार आहे.
काही काळासाठी निवृत्त होण्याचा विचार करत असलेली पिक्सी तिच्या समर ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामध्ये प्रायव्हेट जेटमधून युरोपमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा व्हिडीओ तसेच शॉपिंगसाठी पॅरिसला जाण्याच्या व्हिडीओचा समावेश आहे. ही मुलगी शाळेतल्या इतर मुलांसारखी नाही आहे. ती खूप कमी वयात बिझनेस करून कोट्यधीश बनवली आहे. गाडी चालवायचा शिकण्यापूर्वीच तिच्याकडे मर्सिडिझ बेंझ होती. आता तिच्या या व्हिडीओवर लोकांकडून वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.