Jara Hatke: उडत्या विमानामध्ये पायलट झाला बेशुद्ध, मग प्रवाशाने हाती घेतला कंट्रोल, अखेर....  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:18 PM2022-05-11T14:18:31+5:302022-05-11T16:17:05+5:30

Jara Hatke News: विमान हवेत उडत असताना विमानाच्या पायलटची प्रकृती बिघडल्याची आणि त्यानंतर एका प्रवाशाने विमानाचा कंट्रोल आपल्या हाती घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jara Hatke: The pilot in the flying plane became unconscious, then the passenger took control, finally .... | Jara Hatke: उडत्या विमानामध्ये पायलट झाला बेशुद्ध, मग प्रवाशाने हाती घेतला कंट्रोल, अखेर....  

Jara Hatke: उडत्या विमानामध्ये पायलट झाला बेशुद्ध, मग प्रवाशाने हाती घेतला कंट्रोल, अखेर....  

Next

वॉशिंग्टन - विमान हवेत उडत असताना विमानाच्या पायलटची प्रकृती बिघडल्याची आणि त्यानंतर एका प्रवाशाने विमानाचा कंट्रोल आपल्या हाती घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रवाशाकडे विमान उडवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. मात्र सेसना कारवां नावाच्या एका विमानाला सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात यश आले.

ही घटना अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील आहे. डब्ल्यूपीबीएफ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार पाम बिज इंटरनॅशन एअरपोर्टवर पाहायला मिळाला. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सच्या मदतीने या व्यक्तीने विमानाचं सुरक्षितपणे लँडिंग केलं. पॅसेंजरने सांगितले की, मी त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत होतो.

सेसना कारवांच्या प्रवाशाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितले की, आमचा वैमानिक बेशुद्ध पडला आहे. मला विमान उडवण्याबाबत काहीही माहिती नाही आहे. तेव्हा हे विमान डेस्टिनेशनपासून सुमारे ११२ किमी दूर होते. सेसनाने दिलेल्या माहितीनुसार ३८ फूट लांब असलेल्या या विमानाला ३४६ किमी प्रतितास वेगाने उडवता येऊ शकते. यामध्ये १४ जण बसू शकतात.

रिपोर्टनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोलरने या प्रवाशाला विमान खाली उतवण्यास मदत केली. एटीसीने विमानाला ट्रेस करण्यास मदत केली. तेव्हा हे विमान बोका रेटॉनच्या पाम बिचपासून ४० किमी उत्तरच्या दिशेने जात होते. तेथून ट्रॅफिक कंट्रोलने पॅसेंजरला मार्गदर्शन केले. त्यामुळे विमानाची सेफ लँडिंग झाली.  
 

Read in English

Web Title: Jara Hatke: The pilot in the flying plane became unconscious, then the passenger took control, finally ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.