jara Hatke: पतीला अन्य महिलेपासून मुलं जन्माला घालता येऊ नयेत म्हणून पत्नीनं उचललं असं पाऊल, वाचून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:10 PM2022-03-15T17:10:01+5:302022-03-15T17:10:42+5:30

jara Hatke News: एका महिलेने अजब अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्यानंतर या महिलेला सोशल मीडियावर लोकांकडून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. ही महिला दोन मुलांची आई आहे.

jara Hatke: The step taken by the wife to prevent the husband from having children from another woman | jara Hatke: पतीला अन्य महिलेपासून मुलं जन्माला घालता येऊ नयेत म्हणून पत्नीनं उचललं असं पाऊल, वाचून तुम्ही म्हणाल...

jara Hatke: पतीला अन्य महिलेपासून मुलं जन्माला घालता येऊ नयेत म्हणून पत्नीनं उचललं असं पाऊल, वाचून तुम्ही म्हणाल...

Next

लंडन - एका महिलेने अजब अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्यानंतर या महिलेला सोशल मीडियावर लोकांकडून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. ही महिला दोन मुलांची आई आहे. आता तिची इच्छा आहे की, तिच्या पतीने नसबंदी करवून घेतली पाहिजे. जेणेकरून तिच्या पतीला घटस्फोटानंतरही कुठल्या अन्य महिलेपासून मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पती असे करण्यास तयारही झाला आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने आपला शॉर्ट व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. महिलेचं नाव निकोल आहे. व्हिडीओमध्ये तिने लिहिले की, लोक विचार करतात की मी चुकीचा आहे. कारण मला कुठल्या अन्य महिलेला माझ्या पतीपासून मुले व्हावीत असं वाटत नाही. या महिलेने सांगितले की, ती तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर पतीची नसबंदी करणार आहे.

या व्हिडीओंवरून युझर्स या महिलेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. तसेच एका युझरने लिहिले की, जर महिलेने स्वत: चिटिंग केली. स्वत:च घटस्फोट घेतला तर अशा परिस्थितीत तिच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत संबंधातून मुले का जन्माला घालू नयेत. अनेक लोकांनी लिहिले की, जर हीच गोष्ट कुठल्याही पुरुषाने आपल्या पत्नीबाबत बोलली असती. तर महिलांनी त्यांचं शरीर त्यांची इच्छा असं मत मांडलं असतं.

तर एका व्यक्तीने आश्चर्य व्यक्त करत प्रत्येकजण एवढा क्रेझी असू शकत नाही, असं मत मांडलं त्यावर निकोलने उत्तर देताना सांगितलं की, जर तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तर याचा अर्थ ती क्रेझी आयडिया आहे, असा होत नाही.अजून एका युझरने लिहिले की, मी दाव्यानिशी सांगू शकतो की, पत्नी सोडून जाऊ नये म्हणून, तो पती या गोष्टीसाठी राजी झाला असावा. त्यालाही निकोलने प्रत्युत्तर दिले आहे. तिने सांगितले की, माझ्या आनंदासाठी माझा पती राजी झाला आहे.  

Web Title: jara Hatke: The step taken by the wife to prevent the husband from having children from another woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.