Jara Hatke: मतदारांना वाटल्या ट्रकभर कोंबड्या, उडाली झुंबड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:08 AM2022-11-17T07:08:01+5:302022-11-17T07:08:28+5:30

Jara Hatke: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात कांधला येथे नगरपालिकेचे माजी सभापती हाजी इस्लाम यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत कोंबड्या वाटल्या.

Jara Hatke: Truckloads of chickens were given to the voters. | Jara Hatke: मतदारांना वाटल्या ट्रकभर कोंबड्या, उडाली झुंबड!

Jara Hatke: मतदारांना वाटल्या ट्रकभर कोंबड्या, उडाली झुंबड!

googlenewsNext

शामली : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात कांधला येथे नगरपालिकेचे माजी सभापती हाजी इस्लाम यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत कोंबड्या वाटल्या. हाजी इस्लाम यांनी परिसरात कोंबड्यांनी भरलेला ट्रक पाठवला होता. ट्रकमधून कोंबड्या घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. गर्दीतील कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून तो व्हायरल झाला आहे.

ट्रकवर चढून कोंबडा मिळवण्याच्या प्रयत्नातही अनेक जण व्हिडीओत दिसतात. सुमारे तासभर कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. रांगेतील ज्या लोकांना कोंबडा मिळाला नाही, त्यांना पुढच्या वेळी कोंबडा दिला जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याचे समजते. हे सर्व जनतेचे ऋण होते, ते फेडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया हाजी इस्लाम यांनी दिली.निवडणुकीबाबत अधिसूचना निघालेली नाही. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, तेलंगणातही अलीकडेच एका टीआरएस नेत्याने लोकांना दारूच्या बाटल्या आणि कोंबड्यांचे वाटप केले होते.

Web Title: Jara Hatke: Truckloads of chickens were given to the voters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.