Jara hatke: या फोटोमध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं? त्यावरून समजून जाईल तुमची बुद्धिमत्ता आणि स्वभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:21 PM2022-03-29T12:21:23+5:302022-03-29T12:22:19+5:30
Jara hatke: इंटरनेटवर व्हायरल झालेला हा फोटो एक पर्सनॅटिली टेस्ट आहे. तो तुमच्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतो. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्ही सर्वप्रथम जे काही पाहता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत खूप काही सांगू शकते.
मुंबई - अनेक लोक स्वत:ला खूप स्मार्ट समजतात. काही जण कुठल्याही प्रश्नाचं त्वरित उत्तर देतात. तर काही जण मात्र विचारपूर्वक योग्य उत्तर देतात. मात्र जर कुणी योग्य उत्तर दिलं. तर त्याने काय विचार करून झटपट उत्तर दिलं, याचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते. आता आम्ही तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो दाखवणार आहोत. ज्याला पाहून लोकांचा गोंधळ उडतो. हे नेमकं काय आहे, असा प्रश्न लोकांना पडतो. अशाच एका फोटोने लोकांना कोड्यात टाकले आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेला हा फोटो एक पर्सनॅटिली टेस्ट आहे. तो तुमच्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतो. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्ही सर्वप्रथम जे काही पाहता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत खूप काही सांगू शकते. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या फोटोला पाहून तुमच्या मनात सर्वप्रथम काय उत्तर आलं? त्यावरून तुमची बुद्धिमत्ता आणि स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.
हा फोटो दोन तत्त्वांनी बनलेला आहे. चेहरा आणि वाचणारा माणूस. जर तुम्ही फोटोमध्ये पहिल्यांदा व्यक्तीचा चेहरा पाहिला, तर तुम्ही एक सहज सामाजिक व्यक्ती असू शकता. मात्र, तुम्हाला स्पष्ट उत्तर द्यायला आवडते. मात्र त्यामुळे लोकांमध्ये तुम्हाला नैराश्याचाही सामना करावा लागतो. तु्म्ही शेवटी अशा गोष्टी बोलता, ज्यामुळे लोकांना दु:ख होते. तुम्ही नंतर विचार करता की, कदाचित असं, म्हणता कामा नये होतं.
मात्र जर तुम्ही आधी वाचणाऱ्या व्यक्तीला पाहिलं असेल तर तुम्ही एक सहज स्वभावाच्या व्यक्ती आहात. तुम्हाला दुसऱ्यांचं म्हणणं ऐकायला आवडतं. तसेच तुमचं व्यक्तिमत्त्व हे कल्पनाशील आहे. कधी-कधी तुम्ही चिडचिड्या स्वभावामुळे आसपासच्या लोकांना निराश करू शकता. तुम्ही खूप मोठी स्वप्ने पाहता. त्यामुळे तुमच्यासमोरील अडचणी संपुष्टात याव्यात, अशी तुमची अपेक्षा असते. तुमचे निकटवर्तीय लोकसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते की, तुम्ही लक्ष देत नाही आहात.