सशाच्या कलाकृतीवर लागली रेकॉर्ड ब्रेक बोली, किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:01 PM2019-05-18T13:01:43+5:302019-05-18T13:08:30+5:30
बघायला भलेही ही सशाची कलाकृती तुम्हाला सामान्य वाटत असेल, पण या कलाकृतीने लिलावात रेकॉर्ड कायम केला आहे.
जगभरात वेगवेगळ्या कलाकृतींना विश्वासही बसणार नाही इतक्या किंमतीत खरेदी केल्या जातात. सतत याच्या बातम्याही येत असतात. आता अशीच एक सशाची कलाकृती विकली गेली असून या कलाकृतीने रेकॉर्ड कायम केला आहे. बघायला भलेही ही सशाची कलाकृती तुम्हाला सामान्य वाटत असेल, पण या कलाकृतीने लिलावात रेकॉर्ड कायम केला आहे. या कलाकृतीला ९१.१ मिलियन डॉलर म्हणजेच ६३७ कोटी रूपयांना विकली गेली आहे.
अमेरिकन कलाकार जेफ कूंस यांनी ही रॅबिटची कलाकृती स्टीलपासून तयार केली आहे. मागचे सगळे रेकॉर्ड्स तोडत या कलाकृतीने सर्वात महागडी कलाकृती होण्याचा रेकॉर्ड कायम केला आहे.
(Image Credit : Daily Mail)
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लिलावात बुधवारी सायंकाळी केवळ ३ फूट उंच या कलाकृतीवर बोली लावली गेली होती. या चेहरा नसलेल्या रॅबिटची किंमत अंदाजे ५ ते ७ कोटी लावण्यात आली होती. पण ही बोली ८ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली. तर शेवटी ही कलाकृती ९१,०७५,००० डॉलरला विकली गेली. मूर्तीमध्ये सशाच्या हाती एक गाजरासारखी वस्तू आहे.
बुधवारी लिलावाच्या आधी या कलाकृतीला २०व्या शतकातील कलेची सर्वात प्रतिष्ठित कलाकृती केलं गेलं होतं. वेबसाइटवर याचा प्रिव्ह्यू सुद्धा दाखवण्यात आला होता. चेहरा नसल्याने ही कलाकृती रहस्यमयी ठरते. न्यू यॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही कलाकृती आर्ट डीलर रॉबर्ट मनूचिनने खरेदी केली.