Jet-Black River Beast: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ 'राक्षस', कित्येक वर्षानंतर दिसला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:20 PM2022-05-31T12:20:06+5:302022-05-31T12:20:58+5:30
Jet-Black River Beast: टेक्सासमध्ये दोन मच्छिमारांच्या जाळ्यात एक महाकाय आणि अतिशय दुर्मिळ प्राणी लागला.
Jet-Black River Beast: अमेरिकेतील टेक्सासमध्ये दोन मच्छिमारांच्या हाती एक दुर्मिळ प्राणी लागला आहे. हा प्राणी पाहून ते दोन्ही मच्छिमार आश्चर्यचकित झाले. मच्छिमारांच्या जाळ्यात जेट-ब्लॅक रिव्हर बीस्ट लागला. ही माशांमधील एक अतिशय दुर्मिळ प्रजाती आहे. या प्रजातीतील मासा गेल्या कित्येक वर्षात कोणालाही दिसला नव्हता.
मच्छिमारांनी या माशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही छायाचित्रे व्हायरल झाल्यावर त्यांनी पकडलेला 'दुर्मिळ' प्राणी मेलेनिस्टिक मगर गार असल्याचे उघड झाले आहे. हा मासा किमान 5 फूट लांब असल्याचे सांगितले जाते. मच्छिमार जॉर्डनने सोशल मीडियावर या प्राण्याचे फोटो शेअर केली आहेत. त्या दोघांनी जाळ्यात अडकलेल्या या माशाला तात्काळ सोडून दिले.
पहिल्यांदाच दिसला हा प्राणी
लोटस गाईड सर्व्हिसचे मालक जॉर्डन यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच हा जेट ब्लॅक रिव्हर बीस्ट पाहिला आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, अॅलिगेटर गार सध्याच्या गार प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. हा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या गोड्या पाण्यातील माशांपैकी एक आहे. हा फक्त मिसिसिपी नदीच्या खोऱ्यात राहतो. प्रागैतिहासिक स्वरुपासाठी ओळखला जाणारा हा महाकाय मासा दुर्मिळ झाला आहे.