1800 वर्ष जुन्या सांगाड्यासोबत सापडले दागिने, दफन करताना मुलींना यांनी सजवलं जायचं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:25 AM2023-04-12T09:25:46+5:302023-04-12T09:26:12+5:30
1800 वर्षाआधी तरूणींच्या मृत्यूनंतर त्यांना दफन करताना दागिन्यांनी सजवलं जात होतं. हे 1800 वर्ष जुने अवशेष अशाच स्थितीत आढळून आले आहेत.
जेव्हाही कधी पुरातत्ववादी कुठे खोदकाम करतात तेव्हा एक नवीन परंपरा, नवीन संस्कृतीचं आणि अनेक रहस्यांचा उलगडा होतो. हेच कारण आहे की, पृथ्वीतून समोर आलेले रहस्य लोकांना फार इंटरेस्टींग आणि हैराण करणारे असतात. असेच काही रहस्य इस्त्राईलच्या यरूसलमच्या काही भागात केलेल्या खोदकामातून समोर आले आहेत. खोदकामात 1800 वर्ष जुने सांगाडे सापडले आहेत. त्यासोबतच असं काही सापडलं ज्यामुळे लोक प्रश्नातही पडले.
1800 वर्षाआधी तरूणींच्या मृत्यूनंतर त्यांना दफन करताना दागिन्यांनी सजवलं जात होतं. हे 1800 वर्ष जुने अवशेष अशाच स्थितीत आढळून आले आहेत. यामागे एक अशी मान्यता होती की, मुलीच्या मृत्यूनंतरही हे दागिने त्यांची सुरक्षा करतील.
इस्त्राईलचे पुरातत्ववादी येल एडलर यांच्या नेतृत्वात हे खोदकाम करण्यात आलं. ज्यात मुलींचे सांगाडे सापडले आणि सोबतच खूपसारे दागिनेही सापडले. ज्यात इअररिंग्स, हेअर क्लिप, सोन्याचे लॉकेट, गोल्ड बीड्स, ग्लास बीड्स इत्यादींचा समावेश आहे. आता येल एडलर यांचं निधन झालं. पण त्याआधीच 1971 मध्ये यडलर यांनी सांगून ठेवलं होतं की, खोदकामाच्या अर्धवट रिपोर्टचा खुलासा करावा. या दागिन्यांवर देवी-देवतांचे चित्र आहेत.
ज्या काळातील हे अवशेष आहेत त्या काळात परिवार आपल्या मुलींना दागिन्यांनी सजवून ठेवत होते. ज्यामागे मान्यता होती की, हे दागिने त्यांची सुरक्षा करतील. जेव्हा मुलींचा मृत्यू होत होता तेव्हाही त्यांना दफन करताना दागिन्यांनी सजवलं जात होतं. जेणेकरून पुढेही त्यांची सुरक्षा व्हावी. सोन्याची दागिने तरूणींना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी घातले जायचे.