१ नंबर! सासू सुनेची जोडी लय भारी; कोरोनाकाळात मोबाईल अॅपद्वारे बेरोजगारांना दिली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:44 PM2020-08-24T14:44:17+5:302020-08-24T15:03:02+5:30
कोरोनाकाळात वाढती बेरोजगारी लक्षात घेता यांनी एक मोबाईल अॅप सुरू केलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी हे अॅप वरदान ठरलं आहे.
आजपर्यंत तुम्ही सासू सुनेच्या भांडणाचे अनेक किस्से ऐकल असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा सासू सुनेबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी फक्त एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर तर आहेच पण या सासू सुनेच्या जोडीची काम करण्याची पद्धत पाहून तुम्ही प्रभावित व्हाल. कोरोनाकाळात वाढती बेरोजगारी लक्षात घेता यांनी एक मोबाईल अॅप सुरू केलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी हे अॅप वरदान ठरलं आहे.
ही घटना झारखंमधील धनबादची आहे. ७० वर्षीय मनोरमा सिंग आणि ३२ वर्षीय स्वतीकुमारी यांनी मिळून हे अॅप तयार केलं आहे. या अॅपचं नाव गुरुचेला अॅप आहे. फोनमध्ये प्ले स्टोअवरून सहज कोणीही हे अॅप डाऊनलोड करू शकतं. कोरोनात काळात लोकांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांना ही कल्पना सुचली होती.
शिक्षक आणि विद्यार्थी या अॅपच्या माध्यामातून एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यासाठी फक्त रजिस्टर करावे लागणार आहे. आवश्यकतेनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेण्यासाठी शिक्षक उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे शालेय शिक्षणापासून संगीत, चित्रकला, योग, इंजीनियरिंग, यूपीएससी या विषयातील तज्ज्ञ शिक्षक या अॅपद्वारे भेटीस येतील.
काय आहे हे अॅप?
या अॅपच्या माध्यामातून आतापर्यंत ४० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. ११० विद्यार्थ्यांना या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन प्राप्त होत आहे. याद्वारे वेगवेगळ्या विषयातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळायला मदत होत आहे. ८ हजारांपासून २० हजारांपर्यंत पगार या माध्यामातून मिळवता येऊ शकतो. आईआईटी, आयएसएम, बीआयटी, बीएड केलेले विद्यार्थी सुद्धा यात सहभागी आहेत. या सासू सुनेच्या मते सध्या कोरोनामुळे शिक्षकांना बेरोजगारीचा आणि मुलांना शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन हे अॅप तयार केलं आहे.
यावर्षाच्या शेवटापर्यंत २५० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ठ यांचं आहे. या अॅपमध्ये यांनी गौतम बुध्दांचा ध्यानमग्न फोटो लावला आहे. या अॅपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी असे दोन पर्याय येतात. त्यानंतर तुम्हाला इतर माहिती भरावी लागते. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शिक्षकांना माहिती दिली जाते.
हे पण वाचा-
या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज
बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...
महात्मा गांधीजींच्या चष्म्याची २.५५ कोटींना विक्री; नवीन मालक अमेरिकन