आपल्याच मावशीसोबत केलं लग्न, आईचा बनला दिर; लग्नाची ही अजब गोष्ट एकदा वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:14 PM2022-02-28T12:14:19+5:302022-02-28T12:22:08+5:30
एका तरुणाला आपल्या मावशीवर प्रेम झालं. इतकंच नाही तर त्याने आपल्या मावशीसोबत लग्नही केलं (Man get Married with Aunt) आणि आपल्याच वडिलांचा साडू बनला.
आईची बहीण म्हणजेच मावशीला समाजात आईचा दर्जा दिला जातो. मात्र एखाद्याचं जर मावशीवरच प्रेम जडलं आणि हे प्रेम थेट लग्नापर्यंत पोहोचलं तर? नक्कीच हे सर्वांनाच थक्क करणारं असेल. झारखंडच्या चतरा येथून एक असंच प्रकरण समोर आलं आहे. यात एका तरुणाला आपल्या मावशीवर प्रेम झालं. इतकंच नाही तर त्याने आपल्या मावशीसोबत लग्नही केलं (Man get Married with Aunt) आणि आपल्याच वडिलांचा साडू बनला. सांगितलं जात आहे की या व्यक्तीचे आपल्या मावशीसोबत मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. अखेर त्यांनी लग्न केलं (Weird Wedding Story).
चतराच्या रक्सी गावात राहणाऱ्या सोनू राणाने आपल्या मावशीलाच आपली पत्नी बनवलं. हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सोनूने आपल्या मावशीसोबत हेरूआ नदीजवळील शिव मंदिरात प्रेमविवाह केला. सोनूने आईच्या बहिणीसोबतच लग्न केल्याची त्याच्या बातमी आई-वडिलांना आणि गावातील लोकांना समजताच सगळेच थक्क झाले. गावातील लोकांना या लग्नाला भरपूर विरोध केल्याने या जोडप्यावर पळून जाण्याची वेळ आली. घरातील लोक आणि गावकऱ्यांना कंटाळून दोघांनी पोलीस ठाणं गाठलं. दोघंही सज्ञान आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरातील लोकांची समजूत काढली.
हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतरही दोघांच्या घरचे हा विवाह मान्य करायला तयार नव्हते. तर प्रेमीयुगुल सोबत राहाण्याच्या निर्णयावर ठाम होतं. दोघांच्या घरातल्यांनी पोलिसांसमोरच हे लग्न मान्य करण्यास नकार दिला. मात्र, अखेर पोलिसांनी अनेक प्रयत्नांनंतर त्यांच्या घरच्यांना समजावलं आणि एक बॉन्ड भरून या जोडप्याला घरी पाठवलं.
पोलीस ठाण्यातून आपली नवरी बनलेल्या मावशीला हा मुलगा घरी घेऊन गेला तेव्हा त्याच्या आईने रडून गोंधळ घातला. ती लोकांना आपल्या मुलाला समजवण्याची विनंती करत होती आणि त्या दोघांना त्यांच्या आधीच्या नात्याची जाणीव करून देत होती. इकडे गावातील लोकही या अनोख्या लग्नामुळे हैराण होते. मात्र घरातील लोक आणि गावकऱ्यांचा विरोध सहन करून या प्रेमी जोडप्याने सोबतच आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.