जगभरात केवळ ११२ लोकच करतात 'ही' नोकरी, जाणून घ्या असं काय करतात ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:01 AM2022-12-02T11:01:27+5:302022-12-02T11:01:46+5:30

आज एक असं क्षेत्र आहे ज्यात जगभरातील केवळ ११२ लोकच काम करतात.  हे प्रोफेशन आहे पाणी टेस्टिंगचं. ज्याप्रकारे वाइन टेस्टिंग, कॉफी टेस्टिंग असतं. तसंच पाणी टेस्टिंगचंही एक प्रोफेशन समोर आलं आहे.

Job which have only 112 professional in the world | जगभरात केवळ ११२ लोकच करतात 'ही' नोकरी, जाणून घ्या असं काय करतात ते?

जगभरात केवळ ११२ लोकच करतात 'ही' नोकरी, जाणून घ्या असं काय करतात ते?

googlenewsNext

एक काळ असा होतो जेव्हा काही मोजक्याच क्षेत्रात नोकरी असायची. यातच लोक आपलं करिअर करण्याचा विचार करत होते. पण आज स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज नोकऱ्या मिळतील अशी वेगवेगळी क्षेत्रे अस्तित्वात आली आहेत. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आज एक असं क्षेत्र आहे ज्यात जगभरातील केवळ ११२ लोकच काम करतात.  हे प्रोफेशन आहे पाणी टेस्टिंगचं. ज्याप्रकारे वाइन टेस्टिंग, कॉफी टेस्टिंग असतं. तसंच पाणी टेस्टिंगचंही एक प्रोफेशन समोर आलं आहे.

पाण्याची टेस्टिंग वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. ज्यात हलकी, फ्रुटी, वुडी इत्यादी टेस्ट असतात. द हिंदू बिझनेस लाइनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात या प्रोफेशनमध्ये केवळ एक व्यक्ती आहे. या व्यक्तीचं नाव आहे गणेश अय्यर. गणेश अय्यर देशातील एकुलते एक सर्टिफाइड वॉटर टेस्टर आहेत. गणेश यांनी सांगितले की, येणाऱ्या ५ ते १० वर्षात वॉटर टेस्टिंगच्या सेक्टरमध्ये चांगलीच डिमांड वाढेल.

गणेश अय्यरनुसार, जेव्हा ते लोकांना सांगतात की, ते एक वॉटर टेस्टर आहेत. तेव्हा लोक त्यांच्यावर हसतात. कारण एकीकडे आपल्या देशात शुद्ध पिण्याच्या कामाची कमतरता आहे. तेच दुसरीकडे मी एक वॉटर टेस्टर आहे. अय्यर यांनी सांगितले की, या सर्टिफिकेटबाबत त्यांनी २०१० मध्ये वाचलं होतं. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील Doemens Academy in Graefelfing मधून हा कोर्स केला.

गणेश अय्यरनुसार, पाण्याची वेगवेगळी टेस्ट असते आणि ती प्रत्येक टेस्ट वेगळी असते. यांचे फायदेही वेगवेगळे असतात. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात रेस्टॉरन्ट विश्वात या प्रोफेशनला फार महत्व येणार आहे. गणेश अय्यर हे बेव्हरेज कंपनी Veen भारतीय उपमहाद्वीपचे ऑपरेशन निर्देशक आहेत.
 

Web Title: Job which have only 112 professional in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.