एकेकाळी राहायला घर नव्हतं, आज ६ डिजिटमध्ये कमाई; अशी आहे YouTuber अदितीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:01 PM2023-04-07T16:01:57+5:302023-04-07T16:07:50+5:30

मनाशी निश्चय केला आणि मेहनत केली की आपण हवी ती उंची गाठू शकतो. प्रयागराजच्या एका मुलीची कहाणी अशीच आहे.

Josh Creator youtuber craft Aditi aka aditi Agrawal Crafter Aditi s Story Is Nothing Less Than A Movie know details | एकेकाळी राहायला घर नव्हतं, आज ६ डिजिटमध्ये कमाई; अशी आहे YouTuber अदितीची कहाणी

एकेकाळी राहायला घर नव्हतं, आज ६ डिजिटमध्ये कमाई; अशी आहे YouTuber अदितीची कहाणी

googlenewsNext

मनाशी निश्चय केला आणि मेहनत केली की आपण हवी ती उंची गाठू शकतो. प्रयागराजच्या एका मुलीची कहाणी अशीच आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आज तिनं यशाचं शिखर गाठलंय. आज तिच्याकडे तिचं घर, जवळपास लाखो लोकांची साथही आगे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीची कहाणी सांगत आहोत जिचं नाव आहे अदिती अग्रवाल जिला सर्व जण क्राफ्टर अदिती म्हणतात. ती आज युट्यूबच्या माध्यमातून खुपच प्रसिद्ध झालीये.

२६ वर्षीय आदिती काही वर्षांपूर्वीच लखनौला शिफ्ट झाली आहे. पूर्वी ती प्रयागराजला (तत्कालिन अलाहाबाद) राहायची. तिने तेथील गर्ल्स हायस्कूलमध्ये आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतलं. तिचे वडील खासगी कंपनीत कामाला होते. अदितीचे कुटुंब जवळपास ३० वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते. कधी ते एका रुमच्या फ्लॅटमध्ये तर कधी दोन रूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते. २०२१ मध्ये आदितीचं कुटुंब लखनौला आलं आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. अदितीने हा फ्लॅट स्वतःच्या पैशानं खरेदी केला.

स्पेशलकार्डबनवण्याचीआवड
तिला लहानपणापासूनच कार्ड्स बनवण्याची आवड होती. ८ वी इयत्तेत असताना तिनं टीचर्स डेवर एक कार्ड बनवलं होतं. ते पाहून शिक्षकांनाही आनंद झाला होता. ११ वी त असताना तिला एक ऑर्डर मिळाली आणि त्याच्या मोबदल्यात ३०० रुपये मिळाले. ही तिची पहिली कमाई होती.

फेसबुकद्वारेकार्डविक्री
बारावीच्या परीक्षेनंतर आदितीने कार्ड बनवायचं आणि विकायचं ठरवलं. २०१५ मध्ये, तिने फेसबुकवर अदिती कार्ड झोन नावाचं एक पेज तयार केलं आणि दुसऱ्याच दिवशी तिला ८०० रुपयांची ऑर्डर मिळाली. यानंतर तिने राहत्या ठिकाणीही कार्ड विकण्यास सुरूवात केली. अनेकवेळा ती स्वतः कार्डे पोहोचवायला जायची. मात्र, यादरम्यान तिला अनेक टोमणे ऐकायला मिळाले. अनेकवेळा लोकांनी तिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली, पण अदितीची हिंमत कायम ठेवली आणि तिने देशातील अनेक शहरांमध्ये कार्ड विकण्यास सुरुवात केली.

सुरू केला युट्यूब चॅनल
२०१७ मध्ये आदितीनं तिचा यूट्यूब चॅनल सुरू केला. ग्रॅज्युएशनच्या काळात ती रोज एक व्हिडीओ अपलोड करायची. तिची मोठी बहीण तिला यात मदत करायची. मोठी बहीण तिच्या मोबाईल फोननं व्हिडीओ रेकॉर्ड करायची आणि ती यूट्यूबवर अपलोड करायची. जेव्हा एक व्हिडीओ २ हजार लोकांनी पाहिला तेव्हा तिला प्रोत्साहन मिळालं. मदर्स डे आणि फादर्स डे या दिवशी आदितीनं बनवलेला कार्ड मेकिंग व्हिडीओ व्हायरल झाला आणि २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.

दोन वर्षांत घर घेतलं?
२०१८ मध्ये, आदितीच्या चॅनेलचे १ लाख सबस्क्राबर्स झाले आणि २०२० पर्यंत हा आकडा २.६० लाखांवर पोहोचला. अदिती जी कार्ड्स ऑनलाइन विकायची, त्याची व्हिडीओ बनवून ती अपलोड करायची. अशा प्रकारे तू दोन्ही बाजूंनी कमाई करत होती. दरम्यान, आदितीनं घर घेण्याचा प्लॅन केला. २०२० मध्येच आदितीनं लखनौ दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला, पण शिफ्ट होण्यापूर्वीच कोरोनाची लाट आली. यादरम्यान तिची पळापळ झाली आणि चॅनलची ग्रोथही थांबली.

कोरोनानंतर अदितीच्य चॅनलला थोडा ब्रेक लागला. सबस्क्रायबर्सही कमी झाली. त्यानंतर ती थोडी डिप्रेशनमध्येही गेली. आई वडिलांच्या सांगण्यावरून ती मित्र मैत्रिणींसोबत बाहेरही गेली. परंतु आल्यानंतर ती पुन्हा उदासच होती. तिच्या आईनं तिला पुन्हा हिंमत दिली आणि तिनं व्हिडीओ अपलोड करण्यास सुरूवात केली. तिनं शॉर्ट व्हिडीओ अपलोड केला आणि नंतर १५ दिवसांतच तिचे सबस्क्रायबर्स १० लाखांपर्यंत वाढले. २०२३ पर्यंत तिचे सबस्क्रायबर्स ७० लाखांपर्यंत पोहोचले. आज अनेक जण तिला ओळखतात.

Web Title: Josh Creator youtuber craft Aditi aka aditi Agrawal Crafter Aditi s Story Is Nothing Less Than A Movie know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.