Video - आयडियाची कल्पना! बाटलीच्या झाकणापासून दरवाजाचं लॉक, देसी जुगाड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 02:22 PM2023-09-23T14:22:03+5:302023-09-23T14:22:58+5:30

एका व्यक्तीने टाकाऊ बाटलीच्या झाकणापासून दरवाजाचं लॉक कसं बनवलं आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी देखील कौतुक केलं आहे.

jugaad door lock made by plastic bottle cap internet likes it says everyone not has such mind | Video - आयडियाची कल्पना! बाटलीच्या झाकणापासून दरवाजाचं लॉक, देसी जुगाड व्हायरल

Video - आयडियाची कल्पना! बाटलीच्या झाकणापासून दरवाजाचं लॉक, देसी जुगाड व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी या सतत व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वच हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने असं काही केलं आहे, जे पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

एका व्यक्तीने टाकाऊ बाटलीच्या झाकणापासून दरवाजाचं लॉक कसं बनवलं आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी देखील कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाटलीच्या झाकणापासून लॉक बनवलं आहे. जे खरोखर खूप उपयुक्त आहे. अनेकांसाठी हा जुगाड फायदेशीर ठरू शकतो. हे बनवायला देखील सोपं आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये बाटलीचं झाकण कापून त्याचं लॉक बनवलं आहे. जसं आपण बाटलीला झाकण लावतो. तसेच हे लॉक लावून दरवाजा बंद करता येतो. लोकांना हा जुगाड खूप आवडला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर viralwarganet नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 41 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं - महागड्या लॉकसाठी प्रत्येकाकडे पैसे नसतात. दुसर्‍याने  जेव्हा सुविधा नसतात तेव्हा लोक जुगाडनेच मॅनेज करतात असं म्हटलं आहे. लोकांनी हा शोध लावणाऱ्याचं कौतुक केलं असून हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: jugaad door lock made by plastic bottle cap internet likes it says everyone not has such mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.