रसदार... बहारदार!

By admin | Published: June 11, 2017 01:48 AM2017-06-11T01:48:49+5:302017-06-11T01:48:49+5:30

आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात.

Juicy ... exquisite! | रसदार... बहारदार!

रसदार... बहारदार!

Next

- भक्ती सोमण

आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात.

पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता सारी सृष्टी हिरवा शालू पांघरून वातावरण प्रसन्न करेल. या पावसाळ्याच्या काळात भजी खाणे खूप प्रिय असते. मक्याच्या दाण्यांचे, रानभाज्यांचेही हेच दिवस असतात. हे झाले खाण्याचे. पण लिची, चेरी, कलिंगड, संत्री-मोसंबी अशा विविध फळांनीही हा महिना बहरलेला असतो. या फळांचे आगमन झाल्याची खरी चाहूल लागते ती ट्रेनच्या प्रवासात
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर बारकाईने निरीक्षण करा! एप्रिल, मे महिन्यात कैरी, आवळा विकायला जास्त येतात. तर आता जून महिन्यात लिची, जांभळं विकायला आलेली असतात.
लिची. लालचुटुक रंगाचे हे फळ दिसायला थोडेसे ओबडधोबड दिसत असले तरी ते सोलल्यावर जे पांढऱ्या रंगाचे रसपूर्ण फळ येते त्याची चव अप्रतिम अशीच. तोंडात टाकल्यावर स्वर्गसुख म्हणतात ते काय याची प्रचिती देणारे हे एवढेसे फळ. नुसते खाण्यात तर मजा आहेच. पण त्याचे सरबतही आता अगदी सहज मिळते. लिची सोलून त्याच्या गरात थोडी साखर घालून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे. ते बरेच दिवस टिकते. जेव्हा हवे असेल तेव्हा ते मिश्रण घेऊन त्यात पाणी घालून केलेले सरबत तर अप्रतिम लागते. आता तर स्क्वॅश बॉटलही मिळतात. त्यात लिचीच्या गरासोबत फळही असते. तेही प्यायला अतिशय छान लागते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला चेरी मोठ्या प्रमाणावर येते. ती आईस्क्रीम किंवा काही डेझर्टमध्ये आवर्जून वापरली जाते. चेरीची बी काढून लिंबाच्या सरबताप्रमाणेच त्याचे सरबत होते. चेरीची गोड चव आणि लिंबाचा आंबटपणा, साखर हे प्रकरण फार चविष्ट लागते. याशिवाय जांभळाचे सरबतही केले जाते. तसेच कलिंगडाचा ज्यूस, संत्री-मोसंबीपासून गंगा-जमुना अशी सरबते तर हमखास मिळतात. अशा विविध सरबतांविषयी पुढे पाहूच. जूनपासून सुरू झालेल्या रसदार फळांचे हे दिवस आंबट, गोड चवीची बहार घेऊन आले आहेत. हा अनुभव चवदार मजेदार असेल हे नक्की!
ुँं‘३्र२ङ्मेंल्ल@ॅें्र’.ूङ्मे

खास पेये अशीही
या पावसाळी वातावरणात दिल से खाऊन-पिऊन तृप्त व्हायचे असेल तर महंमद अली रोडचा पर्याय एकदम बेस्ट. सध्या रमझान चालू आहे. या पार्श्वभूमीवर जशी खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळते तशी रेलचेल पेयांचीही असते. या काळात प्रामुख्याने गुलाब सरबत, फालुदा आणि खजुराचे सरबत पिणे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण या काळात दिवसभराच्या कडकडीत उपासाची सांगता शीतलता देणाऱ्या सरबताने करायची असा रिवाज आहे. त्यामुळे रिकाम्या पोटावर पर्यायाने पचनसंस्थेवर एकदम ताण येत नाही. म्हणूनच ही पौष्टिक सरबते प्यायली जातात. गुलाबाच्या सरबताचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. खजुराचे सरबत करताना त्यासोबत काजू, दूध, वेलची, साखर असे घालून करतात. खजुराचा पौष्टिकपणा त्यात उतरतोच शिवाय पोटही भरते.

Web Title: Juicy ... exquisite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.