एक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:42 PM2018-09-08T13:42:28+5:302018-09-08T13:45:05+5:30

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे, ज्या शहरात लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाहीये.

Kamikatsu small town from Japan that produces no trash | एक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही!

एक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही!

भारतात केंद्र सरकार स्वच्छता मोहिम राबवत आहे. जगभरातही कचऱ्याची समस्या वाढली आहे. ही समस्या कशी दूर केली जावी यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. पण त्यातून फारसं काही हाती लागत नाहीये. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे, ज्या शहरात लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाहीये. या शहराचं नाव कामिकात्सु असं आहे. हे शहर जपानच्या शिकोकू द्वीपावर आहे.

कचरा उलण्यासाठी कोणतीही गाडी नाही

कामिकात्सु येथील लोकांसाठी स्वच्छता मोहिम त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. हे लोक याला 'Zero Waste' म्हणजेच 'शून्य कचरा' असं म्हणतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी हे काम ८० टक्के पूर्णही केलं आहे. या छोट्याशा शहरात प्रत्येक अनावश्यक वस्तू रिसायकल केली जाते. यासाठी त्यांनी एक सिस्टम तयार केलं आहे. या शहरात बेकार वस्तूचं एक कलेक्शन सेंटर आहे जिथे ते स्वत: या वस्तू नेऊन देतात. कोणतीही कचरा गाडी त्यांच्याकडे येत नाही. 

खराब वस्तूंच्या ४५ कॅटेगरी

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या कलेक्शन सेंटरची एक प्रणाली आहे. इथे ४५ वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खराब साहित्य ठेवलं जातं. उदा. पेपर, मॅगझिन, कार्टन, मेटल, प्लास्टिकच्या बॉटल, स्टीलची भांडी, अॅल्यूमिनियमच्या कॅन्स, बल्ब आणि असेच काही ४५ प्रकारचे साहित्य. कामिकात्सुमधील लोक जगातल्या इतर ठिकाणांप्रमाणेच वेगवेगळ्या साहित्यांचा, वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे त्यापासून कचराही इतर ठिकाणांसारखाच तयार होत असेल. पण त्याची विल्हेवाट लावण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. 

रिसायकल करतात सगळ्याच गोष्टी

लोक इथे अनावश्यक असलेल्या ८० टक्के वस्तूंचं रिसायकल करतात. तर २० टक्के अशा गोष्टी आहेत ज्यांचं रिसायकल केलं जात नाही. त्या वस्तू जमिनीत गाळल्या जातात किंवा जाळल्या जातात. येथील लोकांनी २००३ मध्ये हा निर्णय घेतला आहे की, २०२० पर्यंत Zero Waste चं लक्ष्य पूर्ण केलं जाईल. 

जीवनशैलीचा भाग

याची सुरुवात अर्थातच कठीण होती. पण पर्यावरणाबाबत जागरुकता ही कामिकात्सु येथील लोकांच्या जीवनाचा भाग झाली आहे. ते रोज बेकार गोष्टी गोळा करतात आणि कलेक्शन सेंटरला पोहोचवतात.

एक्सचेंजमध्ये मिळतं दुसरं साहित्य

घरातील वापरात नसलेले कपडे आणि ज्वेलरी कलेक्शन सेंटरमध्ये जमा करणाऱ्यांना कोणतीही अतिरीक्त रक्कम न घेता दुसऱ्या वापरता येतील अशा वस्तू दिल्या जातात. म्हणजे एक्सचेंजसारखं. शहरातच एक फॅक्ट्री आहे जिथे कलेक्शन सेंटरमध्ये जमा साहित्यातून महिला खेळणी आणि दुसऱ्या वस्तू तयार करतात.

Web Title: Kamikatsu small town from Japan that produces no trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.