एक शहर जिथे लोक 'उंदरांच्या बिळात' राहतात, असं रहस्यमय गाव ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:06 IST2025-04-07T15:53:45+5:302025-04-07T16:06:37+5:30
Kandovan Village : तुम्ही कधी मनुष्यांना उंदरांच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत.

एक शहर जिथे लोक 'उंदरांच्या बिळात' राहतात, असं रहस्यमय गाव ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल...
Kandovan Village : पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याबाबत आजही मनुष्यांना माहीत नाही. काही लोक ज्वालामुखीच्या तोंडाशी राहतात तर काही लोक घनदाट जंगलात राहतात. खूप आधी लोक गुहांमध्ये राहत होते. पण आता असं काही होत नाही. मात्र आजही असे काही लोक आहेत जे गुहा तर नाही, पण अशा एका ठिकाणी राहतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्ही कधी मनुष्यांना उंदरांच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. इराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील लोक या ठिकाणी शेकडो वर्षांपासून इथेच राहतात.
कंदोवनची खासियत
जगभरात अनेक सुंदर आणि नैसर्गिकपणे वेगळी असलेली गावे आहेत. ही गावं आपल्या जुन्या परंपरा जपून ठेवतात. कुठे झोपड्या तर कुठे गुहा किंवा झाडांखाली लोकांचं जीवन असतं. पण कंदोवनमधील लोक 'उंदरांच्या' बिळात राहतात. हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. येथील लोक त्यांची घरे उंदराच्या बिळासारखी बनवतात. चला जाणून घेऊ यामागचं रहस्य...
उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम
हे घर दिसायला अजब वाटतात, पण राहण्यासाठी फारच आरामदायक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव ७०० वर्ष जुनं आहे. इथे राहणाऱ्या लोकांना ना हीटरची गरज पडत ना एसीची. उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात गरम राहतात.
येथील लोकांनुसार, इथे राहणाऱ्या लोकांनी हे गाव मंगोलांपासून वाचवण्यासाठी बनवलं होतं. कंदोवनमधील प्रारंभिक निवासी इथे मंगोलांपासून वाचण्यासाठी आले होते. ते लपण्यासाठी ज्वालामुखीच्या डोंगरांमध्ये जागा शोधत होते. आणि तिथेच राहत होते.