ए उठ, सकाळ झाली! घरफोडीसाठी आलेल्या चोराला पोलिसांनी उठवलं; रात्रभर गादीवर झोपला होता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:52 PM2021-09-06T16:52:59+5:302021-09-06T16:53:22+5:30

घरफोडीसाठी तीन चोरटे आले; दोघांनी हात साफ केले, एक गादीवर पडला, डोळा लागल्यानं सकाळपर्यंत झोपला

Kanpur Thief Came To Steal Slept On A Comfortable Mattress Woke Up In Morning By Police | ए उठ, सकाळ झाली! घरफोडीसाठी आलेल्या चोराला पोलिसांनी उठवलं; रात्रभर गादीवर झोपला होता 

ए उठ, सकाळ झाली! घरफोडीसाठी आलेल्या चोराला पोलिसांनी उठवलं; रात्रभर गादीवर झोपला होता 

googlenewsNext

कानपूर: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये चोरीची एक अजब घटना घडली आहे. गेल्या शनिवारी घडलेली घटना आता उघडकीस आली आहे. एका घरात चोरी करण्यासाठी तीन चोर रात्रीच्या सुमारास शिरले. त्यातला एक चोर गादीवर जाऊन झोपला. गादी आरामदायी असल्यानं तिथेच त्याचा डोळा लागला. दरम्यान त्याच्या दोन साथीदारांनी हात साफ करून पळ काढला. 

सकाळ झाल्यावर घरमालक उठला. घरात चोरी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. मात्र एक चोर गादीवर झोपला असल्याचं मालकाला दिसलं. मालकांनी पोलिसाला बोलवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तरी चोर झोपलेलाच होता. पोलिसांनी त्याला उठवलं आणि ताब्यात घेतलं. बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 

जरौलीत वास्तव्यास असलेल्या पवन गुप्तांची घरात चोरी झाली. पवन गुप्ता यांनी नुकतंच नवं घर बांधलं. त्यांच्या घराजवळ कोणतंही घर नाही. गेल्या शनिवारी पवन कुटुंबासोबत एका खोलीत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनी कपाटातील लॉकर तोडून दोन मंगळसूत्र, कर्णाभूषणांचा एक जोड, पैजणांचे दोन जोड आणि दोन लाख रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी पवन यांनी रविवारी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

रविवारी सकाळी पवन यांना घरातलं सर्व सामान अस्ताव्यस्त स्थितीत दिसलं. कपाटाचं लॉकर तोडण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. शेजारच्या खोलीत एक चोर त्यांना झोपलेला दिसला. त्याला पाहून कुटुंब हैराण झालं. त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलं. चोरट्यानं त्याची दोन्ही साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Kanpur Thief Came To Steal Slept On A Comfortable Mattress Woke Up In Morning By Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.