अजबच! 30 वर्षाआधी मृत मुलीच्या लग्नासाठी वर शोधत आहे कुटुंब, जाहिरातीत ठेवल्या 'अशा' अटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:38 AM2024-05-15T10:38:45+5:302024-05-15T10:39:43+5:30

सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

Karnataka family looking for a groom for their daughter who died 30 years ago | अजबच! 30 वर्षाआधी मृत मुलीच्या लग्नासाठी वर शोधत आहे कुटुंब, जाहिरातीत ठेवल्या 'अशा' अटी!

अजबच! 30 वर्षाआधी मृत मुलीच्या लग्नासाठी वर शोधत आहे कुटुंब, जाहिरातीत ठेवल्या 'अशा' अटी!

लग्नासाठी वर किंवा वधु हवेत अशा वेगवेगळ्या अवाक् करणाऱ्या जाहिरातील आपण बघत असतो. ज्यात अनेक अजब अटीही दिलेल्या असतात. ज्या नेहमीच व्हायरल होत असतात. पण सध्या कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या एका वृत्तपत्रातील एक जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. जी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

ही अजब जाहिरात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरमधील एका परिवाराने दिली आहे. या परिवाराचं असं मत आहे की, त्यांच्या दिवंगत मुलीचं लग्न न झाल्याने त्यांच्या परिवारावर संकटं येत आहेत.

परिवारानुसार, साधारण तीस वर्षाआधी नवजात मुलीचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून परिवाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक संकटं त्यांच्यावर आली आहेत.

परिवाराने जेव्हा वयोवृद्ध लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, होऊ शकतं की, दिवंगत मुलीची भटकत असलेली आत्मा याचं कारण असू शकतं. आता परिवाराने तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या मुलीसाठी वर शोधण्यासाटी वृत्तपत्रात जाहिरात दिली. जी सध्या चर्चेत आहे.

जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलं की, 'तीस वर्षाआधी मरण पावलेल्या नवरीसाठी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या नवरदेवाशा शोध आहे. कृपया प्रेत मुदुवा म्हणजे प्रेतांच्या विवाहासाठी संबंधित नंबरवर फोन करा'.

पण मृत मुलीचे आई-वडील अनेक प्रयत्न करूनही तिच्या वयाचा, जातीचा आणि तेवढ्या वर्षाआधी मृत झालेला वर न मिळाल्याने दु:खी आहेत.

मृत व्यक्तींच्या अपारंपारिक लग्नाची परंपार तुलुनाडू भागात प्रचलित आहे. या भागाच्या अंतर्गत कर्नाटक आणि केरळच्या कासरगोड जिल्ह्याचे काही भागही येतात. येथील स्थानिक भाषा तुलु असते. या भागांमध्ये मृत लोकांचं लग्न लावण्याला भावनात्मक महत्व आहे.

तुलुवा लोकांच्या संस्कृतीचे जाणकार सांगतात की, या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, दिवंगत आत्म्यांचा परिवारासोबत संबंध असतो आणि ते आनंद किंवा दु:खात सोबत असतात.

Web Title: Karnataka family looking for a groom for their daughter who died 30 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.