काय सांगता? कर्नाटकमध्ये पिकताहेत आईस्क्रीम केळी; निळ्या केळ्यांची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:59 AM2021-08-10T09:59:11+5:302021-08-10T09:59:33+5:30
पाच महिन्यांपूर्वी जावा केळी इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय ठरला होत्या
मंगळुरू : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथानगाडी तालुक्यात अनिल (३७) नावाच्या शेतकऱ्याचे २५ एकरवरील शेती हे एक छोटे जगच आहे. १५ वर्षांपासून ते या जमिनीवर उष्णकटिबंधातील फळांचे उत्पादन घेत असून, आता ते आईस्क्रीम केळीचे (ब्लू जावा बनानाज) पीक घेत आहेत. ही केळी आईस्क्रीम बनानाज म्हणून लोकप्रिय आहेत. अनिल यांची शेती गुरुवायनकेरेजवळ बालंजा येथे आहे. ते पिकवत असलेली फळे ही मध्य किंवा दक्षिण अमेरिका, युरोप किंवा आग्नेय अशियायी देशांतील आहेत.
अनिल म्हणाले की, ‘आग्नेय आशियात लोकप्रिय असलेल्या जावा बनानाजचे पीक कर्नाटकमधील शेतकरी बहुधा पहिल्यांदाच घेत आहेत.” पाच महिन्यांपूर्वी या जावा केळी इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय ठरला होत्या, कारण ती व्यक्ती त्याबद्दल खूप तपशिलाने बोलली आणि त्या केळीची चव ही प्रत्यक्षात व्हॅनिला आईस्क्रीमसारखी असल्याचे त्याने सांगितले, असे अनिल म्हणाले. या केळींची कातडी निळी असून केळी मलईसारखी आहेत. या केळींच्या रोपांना बाधा होऊ नये म्हणून त्यांना पिशव्यांत वाढवले जाते. त्यामुळे त्याच्या फळांचा घड मोजक्याच म्हणजे पन्नासचा असतो. मी दोन वर्षांपूर्वी थायलंड येथील प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा तेथून टिश्शू कल्चर्ड रोप आणण्यासाठी वाहतुकीच्या खर्चासह २१ हजार रुपये खर्च केले होते, असे अनिल म्हणाले.