वाह, १ नंबर! प्लास्टीकच्या कचऱ्यापासून 'असं' बनवलं आकर्षक घर; पाहा फोटो

By Manali.bagul | Published: November 17, 2020 07:32 PM2020-11-17T19:32:19+5:302020-11-17T19:46:29+5:30

Inspirational Stories in Marathi : समुद्राजवळ कचरा वेचत असलेल्या लोकांचे जीवन समृद्ध बनवणं हे या फाऊंडेशनचे उद्दीष्ट आहे.

karnataka gets its first recycled plastic house in mangaluru see pics | वाह, १ नंबर! प्लास्टीकच्या कचऱ्यापासून 'असं' बनवलं आकर्षक घर; पाहा फोटो

वाह, १ नंबर! प्लास्टीकच्या कचऱ्यापासून 'असं' बनवलं आकर्षक घर; पाहा फोटो

googlenewsNext

(Image Credit- TOI)

प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणावर तयार होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. प्लास्टीकचा कचरा काही प्रमाणात कमी झालेला असला तरी पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यामुळे नद्या, समुद्र, गटारं, रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण इंजिनिअर्सनी टाकाऊ प्लास्टीकपासूनसुद्धा नवीन वस्तू तयार करायला सुरूवात केली आहे. प्लास्टीक फॉर चेंज इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मंगलूरूमध्ये प्लास्टीकचा कचरा रिसायकल करून एक सुंदर, आकर्षक घर तयार करण्यात आलं आहे. हे कर्नाटकातील पहिले एन्वारमेंट फ्रेंडली रियाकल हाऊस आहे. 

House

घर तयार करण्यासाठी जवळपास १५०० किलो प्लास्टीकचा वापर

कर्नाटकातील समुद्राजवळ कचरा वेचत असलेल्या लोकांचे जीवन समृद्ध बनवणं हे या फाऊंडेशनचे उद्दीष्ट आहे. अलिकडेच कमला नावाच्या एका महिलेसाठी प्लास्टीकपासून एक सुंदर घर तयार करण्यात आलं आहे. या फाऊंडेशनचे प्रमुख शिफरा जेकब्स यांनी सांगितले, '' हे घर तयार करण्यासाठी जवळपास  १५०० किलो रिसायकल प्लास्टीकचा वापर करण्यात आला होता. याशिवाय घरबांधणीसाठी एकूण  ४.५ लाख रुपयांचा खर्च आला. पर्यावरणीय दृष्टीकोनातून हे घर उत्तम आहे. घर तयार करण्याआधी निर्मीतीसाठी वापरात असलेल्या वस्तूंची क्वालिटी टेस्ट करण्यात आली होती.  घर वर्षानुवर्षे टिकून राहण्यासाठी चांगल्या दर्जाच्या सामानाचा वापर करण्यात आला होता. '' बाबो! ४८ वर्षांच्या माणसानं १३ वर्षीय मुलीशी केलं लग्न; आतापर्यंत आहेत ४ बायका, पाहा फोटो

पुढे त्यांनी सांगितले की,  ''२०२१ मध्ये कचरा वेचत असलेल्या कामगारांसाठी जवळपास  २० घरं आम्ही तयार करू शकू अशी आशा व्यक्त करतो. यासाठी २० टन प्लास्टीकचा वापर केला जाणार आहे. हे फाऊंडेशन मंगळूरूच्या पच्चूचेरी आणि कोरीकत्तामध्ये राहत असलेल्या  लोकांचे शिक्षण आणि अन्य समस्यांवर मिळून काम करत आहे.''  प्रेयसीला त्यानं एकटा असताचा फोटो पाठवला; अन् सेल्फी पाहाताच अशी झाली पोलखोल; पाहा फोटो

Web Title: karnataka gets its first recycled plastic house in mangaluru see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.