Donkey Milk Business: IT क्षेत्रातील नोकरी सोडून गाढविणीचं दूध विकत आहे ही व्यक्ती, लाखोंमध्ये होत आहे कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:59 PM2022-06-16T12:59:36+5:302022-06-16T13:01:22+5:30
Donkey Milk Farm in Mangaluru: या व्यक्तीचं नाव आहे श्रीनिवास गौडा आणि तो 2020 पर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. श्रीनिवासनुसार, हे कर्नाटकातील पहिलं गाढव पालन आणि ट्रेनिंग सेंटर आहे.
Donkey Milk Farm in Mangaluru: कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये एका व्यक्तीने गाढविणीच्या दुधाचं फार्म सुरू करण्यासाठी आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. या व्यक्तीचं नाव आहे श्रीनिवास गौडा आणि तो 2020 पर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. श्रीनिवासनुसार, हे कर्नाटकातील पहिलं गाढव पालन आणि ट्रेनिंग सेंटर आहे.
न्यूज एजन्सी ANI सोबत बोलताना श्रीनिवास गौडा म्हणाले की, 'मी आधी 2020 सालापर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होतो. आता मी कर्नाटकातील पहिलं गाढव पालन आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे'. गाढविणीच्या दुधाचे फायदे आणि शेतासाठी आपल्या योजनेबाबत सांगताना श्रीनिवास म्हणाला की, सध्या त्याच्याकडे 20 गाढविणी आहेत आणि मी जवळपास 42 लाख रूपये गुंतवणूक केली आहे'.
त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही गाढविणीचं दूध विकण्याची योजना बनवत आहे. ज्याचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. आमचं स्वप्न आहे गाढविणीचं दूध सर्वांना मिळावं. गाढविणीच्या दुधात औषधी गुण आहेत. श्रीनिवास यांनी सांगितलं की, गाढवांच्या प्रजातीच्या संख्येत घट झाल्याने मी या फार्मबाबत विचार केला.
Karnataka | A man quits his IT job to open a 'Donkey Milk Farm' in Mangaluru
— ANI (@ANI) June 16, 2022
I was previously employed in a software firm until 2020. This is one of a kind in India and Karnataka's first donkey farming and training center: Srinivas Gowda, farm owner pic.twitter.com/pLvrnWCV1j
रिपोर्ट्सनुसार, हे दूध पॅकेटमध्ये उपलब्ध होईल आणि 30 मिलीलीटर दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रूपये असेल. ते म्हणाले की, दुधाचे पॅकेट मॉल, दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये मिळतील. त्यांनी असाही दावा केला की, त्यांना आधीच 17 लाख रूपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
श्रीनिवास गौडा म्हणाले की, गाढविणीचं दूध 5 हजार रूपये ते 7 हजार रूपये प्रत लीटर मिळतं. गाढविणीचं मूत्र 500 ते 600 रूपये प्रति लीटर मिळतं. रामनगर जिल्ह्यातील कनकपुराच्या शेतकरी परिवारातील श्रीनिवास यांचं स्वप्न आहे की, त्यांना शेतीत मोठं यश मिळवायचं आहे.
गाढविणीच्या दुधाचे फायदे
गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. अस्थमा, सतत होणारी सर्दी, पचनक्रिया सुधारणे, खोकला, ताप, संसर्गजन्य रोग, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, हृदयरोग इत्यादींवर हे दूध फायदेशीर मानलं जातं.