काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:57 PM2020-09-08T14:57:11+5:302020-09-08T15:01:13+5:30

विशेष म्हणजे या प्रकाराला आध्यात्मिक अनुभूतीचे साधन  समजलं जातं.

karnataka marijuana serves as a prasad in temples | काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा  

काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा  

Next

भारतात हजारो वर्ष जुनी मंदिरं असून मंदिरांची  खासियत, मान्यता, प्रथा परंपराही वेगवेगळ्या आहेत. अनेक प्रथांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. कारण त्या मंदिराशी अनेकांचा कधीही थेट संबंध येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबाबत सांगणार आहोत. ज्या मंदिराबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. हे मंदिर कर्नाटकात आहे.  उत्तर कर्नाटकातील मंदिरात चक्क गांजा (मारिजुआना) पवित्र समजला जातो. म्हणून मंदिरांमध्ये चक्क प्रसाद म्हणून गांजा दिला जातो.

अवधूत, शप्त, अरुणा, सरना परंपरेत मारिजुआना किंवा गांजाचे विविध प्रकार ओढले जातात. विशेष म्हणजे या प्रकाराला आध्यात्मिक अनुभूतीचे साधन  समजलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण यादगीर जिल्ह्यातील तिनाथिनी येथील मौनेश्वर मंदिरात जानेवारी महिन्यात यात्रा भरते. या यात्रेला येत असलेल्या भाविकांना चक्क गांज्याची पाकिटं प्रसाद म्हणून वाटली जातात.

संत आणि भक्तांचा असा विश्वास आहे की हे पवित्र गवत अध्यात्मिक प्रबोधनाच्या मार्गावर लोकांना घेऊन जाते. मात्र मंदिराच्या बाहेर गांजा विक्रीस बंदी आहे.

मौनेश्वर किंवा मनप्पा देवीची प्रार्थना केल्यानंतर गांज्याचा प्रसाद खाल्ला जातो. मंदिर समितीच्या वतीनेच हा गांजा दिला जातो. समितीचे सदस्य गंगाधर नायक आहेत.  गंगाधर यांनी सांगितले की,'' गांजाचे सेवन येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते. संत आणि भक्तांचा असा विश्वास आहे की हे पवित्र गवत अध्यात्मिक प्रबोधनाच्या मार्गावर लोकांना घेऊन जाते. मात्र मंदिराच्या बाहेर गांजा विक्रीस मनाई करण्यात आली आहे.''

पुढे त्यांनी सांगितले की,  लोक येथे येऊन गांजा घेतात. तर, काही लोक गांजा उकळून त्याचं सेवन करतात. तर, काही लोकं तंबाखूची पावडर करून खातात. सरना समुदायावर संशोधन करत असलेल्या प्राध्यापक मीनाक्षी बाळे यांना सांगितले की, जे लोक मंदिरात गांजाचे सेवन करतात ते व्यसनाधीन नसतात. केवळ प्रसाद म्हणून गांज्याचे सेवन करतात. 

हे पण वाचा-

नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण

महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि...

Web Title: karnataka marijuana serves as a prasad in temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.