७३० कैद्यांसोबत तुरुंगात कैद आहे एक अस्वल, यासाठी मिळाली त्याला जन्मठेपेची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:36 PM2019-04-16T15:36:38+5:302019-04-16T15:40:20+5:30
केट्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामान्यपणे इथे कायदेशीर मिळणारी शिक्षा ही २५ वर्ष असते.
कझाकिस्तानच्या कोस्टनी तुरुंगात एकूण ७३० कैदी आहेत. यातील जास्तीत जास्त कैदी हे गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत. या तुरुंगात ७२९ कैद्यांमध्ये एक कैदी आहे कट्या. केट्याचं वय ३६ वर्ष आहे आणि तो एक अस्वल आहे. केट्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामान्यपणे इथे कायदेशीर मिळणारी शिक्षा ही २५ वर्ष असते. पण केट्याला जन्मभर इथेच रहावं लागेल.
कशासाठी मिळाली शिक्षा?
एका अस्वलाला मनुष्यांच्या तरुंगात का शिक्षा दिली गेली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. केट्याला २००४ मध्ये तुरुंगात डांबलं गेलं. त्याला कैद करण्यासाठी विशेष प्रकारचा पिंजरा तयार करण्यात आला. केट्याने दोन माणसांवर हल्ला केला होता. त्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.
११ वर्षाच्या मुलावर केला होता हल्ला
लहान असतानाच केट्याला सर्कसमधून बाहेर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला एका कॅंपिंग साइट पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. तिथे जे पर्यटक यायचे आणि त्याला खायला फळ द्यायचे. पण १५ वर्षांचा असताना केट्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता. हा मुलगा त्याला काहीतरी खायदा देण्यासाठी त्याच्या जवळ गेला होता. केट्याने त्याच्या पायांना ओढलं होतं. यात मुलगा गंभीर जखमी झाला होता.
दुसरी घटना
त्याच वर्षी केट्याने एका २८ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला होता. विक्टर असं या व्यक्तीचं नाव होतं. विक्टर हा दारुच्या नशेत होता. त्याने शेकहॅंन्डसाठी केट्यासमोर हात केला. या दोन घटनांनंतर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की, केट्याला तेथून काढावं. पण कोणतंही प्राणी संग्रहालय केट्याला ठेवण्यासाठी तयार नव्हतं. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा देऊन तुरुंगात बंद केलं.
तुरुंगाची ओळख झालाय केट्या
केट्या १५ वर्षांपासून UK-161/2 मध्ये बंद आहे. आता तो या तुरुंगाची ओळख झाला आहे. इतर कैद्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांमध्येही केट्या लोकप्रिय आहे. सर्वच त्याला खाण्यासाठी काहीतरी आणत असतात.
केट्याच्या खाण्यावर प्रशासन फार खर्च करत नाही. कारण इतर कैद्यांचं वाचलेलं अन्नच त्याला दिलं जातं. येथील एक अधिकारी सांगतात की, 'केट्या आमच्या पीनल कॉलनीची ओळख आहे. आम्ही सर्व त्याचे आणि तो आमचा भाग झाला आहे. आम्ही त्याला आता कुठेही जाऊ देणार नाही'.