30 कोटी रूपये पगार, तरीही कुणी करायला बघत नाही ही नोकरी, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:25 PM2024-11-11T13:25:09+5:302024-11-11T13:26:31+5:30
ही नोकरी इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदराच्या फारोस नावाच्या द्वीपावरील लाईटहाऊस ऑफ अलेक्झांड्रियाच्या कीपरची नोकरी.
Toughest Job in the World: कोट्यावधी रूपये सॅलरी, ना बॉस ना कामाचा ताण, तरीही एक अशी नोकरी आहे जी करण्यासाठी व्यक्तीच मिळत नाहीये. इतके पैसे आणि काहीच काम नसलेली अशी नोकरी अनेकांचं स्वप्न असते. अशाच एका नोकरीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही नोकरी इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदराच्या फारोस नावाच्या द्वीपावरील लाईट हाऊस ऑफ अलेक्झांड्रियाच्या कीपरची नोकरी.
जुमनो लाईट हाऊसच्या कीपरच्या या नोकरीसाठी वर्षाला ३० कोटी रूपये पगार मिळतो. अर्थातच जगातल्या सगळ्यात जास्त पगारांच्या नोकरींपैकी ही नोकरी असेल. या नोकरीची खासियत म्हणजे व्यक्ती कधीही झोपू शकते. कधीही फिशिंग करू शकतो. फक्त त्याचं काम इतकंच आहे की, लाईट हाऊसचा लाइट सुरू रहावा. या नोकरीची खासियत म्हणजे सतत किटकिट करणारे बॉसही समोर नसतो. म्हणजे वर्षातून केवळ काही वेळाच त्याची आणि बॉसची भेट होते. तरीही लोक ही नोकरी करण्यास पुढे येत नाहीत.
या लाईट हाऊसमधील कीपरचं एकच काम असतं की, त्याला या लाईटवर नजर ठेवावी लागते जेणेकरून तो कधीही बंद होऊ नये. बाकी २४ तास ही व्यक्ती काहीही करू शकते. ऐकायला फार चांगलं वाटत असलं तरीही ही नोकरी काही इतकीही सोपी आणि आरामदायी नाही. ही नोकरी जगातल्या सगळ्यात अवघड नोकरींपैकी एक मानली जाते.
ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला समुद्राच्या मधोमध असलेल्या लाइट हाऊसवर एकटंच रहावं लागतं. त्याच्यासोबत कुणी बोलणारं नसतं, ना आजूबाजूला कुणी लोक राहतात. अनेकदा समुद्राच्या मधोमध असलेल्या लाईट हाऊसला अनेक वादळांचा सामना करावा लागतो. अनेकदा तर लाटा इतक्या उंच असतात की, लाईट हाऊस त्याखाली झाकलं जातं. अशात कीपरच्या जीवाला धोकाही असतो.
इजिप्तला येणार जहाजांना रस्ता दाखवण्यासाठी आणि त्यांचा मोठमोठ्या खडकांपासून बचाव करण्यासाटी हे लाईट हाऊस बनवलं होतं. जे जगातील पहिलं लाईट हाऊस आहे.