'या' अब्जाधीशाने खरेदी केला डायनासॉरचा सांगाडा, किंमत वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:34 PM2024-08-10T12:34:07+5:302024-08-10T12:44:11+5:30
dinosaur skeleton : या सांगाड्याचं नाव एपेक्स आहे. हा सांगाडा साधारण ८.२३ मीटर लांब असून हा डायनासॉरचा सांगाडा जवळपास १५० मिलियन वर्ष जुना आहे.
dinosaur skeleton : अब्जाधीश केन ग्रिफीन सध्या एका डायनासॉरचा सांगाडा विकत घेण्यावरून चर्चेत आहे. ३७.८ अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या केन यांनी हा सांगाडा ४४.६ मिलियन डॉलर म्हणजे एकूण ३,७४,४२,१४,६०० रूपयांना खरेदी केला. हा अवशेषांच्या लिलावाचा एक नाव रेकॉर्ड झाला आहे. या सांगाड्याचं नाव एपेक्स आहे. हा सांगाडा साधारण ८.२३ मीटर लांब असून हा डायनासॉरचा सांगाडा जवळपास १५० मिलियन वर्ष जुना आहे.
एका लिलावात त्यांनी हा सांगाडा खरेदी केला. न्यूयॉर्कच्या सोथबीजमध्ये हा लिलाव पार पडला. आधी असा अंदाज लावण्यात आला होता की, या सांगाड्याला साधारण ६ मिलियन डॉलर इतकी किंमत मिळेल. पण केन यांनी जवळपास ११ पट जास्त किंमत देऊन सगळ्यांनाच धक्का दिला.
एपेक्स नावाचा हा डायनासॉरचा सांगाडा मे २०२२ मध्ये कोलोराडोमध्ये शोधण्यात आला होता. हा आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सगळ्यात मोठ्या सांगाड्यापैकी एक आहे. या सांगाड्यात साधारण २५४ हाडे सापडली. ज्या ३१९ हाडांपैकी एक आहेत.
हा सांगाडा खरेदी केल्यावर केन यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "एपेक्स अमेरिकेत जन्माला आला होता आणि अमेरिकेतच राहणार". त्यांनी हा सांगाडा केवळ आवड म्हणून खरेदी केला नाही तर ते हा सांगाडा एखाद्या अमेरिकन संस्थेला कर्जावर देऊ शकतात जेणेकरून लोक याला बघू शकता.
एपेक्सची खरेदी करून त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तुंच्या संग्रहात आणखी एका गोष्टीची भर घातली आहे. यातून हेही दिसून येतं की, श्रीमंत लोक ऐतिहासिक आणि अनोख्या गोष्टींवर पैसे लावू लागले आहेत.
यातून हेही दिसून येतं की, दुर्मिळ गोष्टी किती मौल्यवान आहेत. श्रीमंत लोक आणि संस्थांमध्ये या गोष्टी खरेदी करण्यात एक स्पर्धाच रंगली आहे. यामुळे लोकांमध्ये डायनासॉरबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.