नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये रातोरात बनला करोडपती; अन् आता करणार 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:21 PM2020-05-21T18:21:54+5:302020-05-21T18:27:50+5:30
बुधवारी या व्यक्तीला भारीच लॉटरी लागली आणि जणूकाही नशीबच बदललं आहे.
(image credit- gulfnews.com)
लॉटरी लागणं अनेकदा फक्त कल्पनेपुरतंच मर्यादित असतं. अनेकांना असं वाटतं की, आपल्याला आयुष्यात एकदातरी लॉटरी लागायला हवी. तुम्हाला माहित आहे का लॉकडाऊनमध्ये एका दक्षिण भारतीय व्यक्तीला खरीखुरी लॉटरी लागली आहे. ते ही लॉकडाऊनमध्ये. एका भारतीय व्यावसाईकाला दुबईमध्ये ड्यूटी फ्री (DDF) ड्रॉ मध्ये करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे.
या ४३ वर्षीय व्यावसाईकाचं नाव राजन कुरियन असं आहे. मुळचा केरळमधील कोट्यमचा रहिवासी असलेला हा व्यक्ती लॉकडाऊनमध्ये करोडपती बनला आहे. बुधवारी या व्यक्तीला भारीच लॉटरी लागली आणि जणूकाही नशीबच बदललं आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती 7.6 करोड़ रुपये जिंकला आहे.
राजन यांनी लॉटरी लागल्यानंतर सांगितले की, ''मी जिंकलेल्या रकमेचा मोठा हिस्सा गोरगरीबांना मदत करण्यासाठी खर्च करणार आहे. मी लॉटरी जिंकल्याबाबत आभार व्यक्त करतो. या रक्कमेची सध्याच्या काळात ज्या लोकांना गरज आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवी असं मला वाटतं.'' संकटाच्या काळात लॉटरी लागल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या महामारीचा सुद्धा उल्लेख केला. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी हे लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं, याशिवाय आता लॉटरीतून मिळालेले पैसे गरजवंतासाठी खर्च करणार असल्याचे ही ते म्हणाले.
कुरियन केरळमध्ये कंस्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपला व्यवसाय करतात. लॉटरीतील काही पैसे ते आपल्या बिजनेससाठी वापरणार आहेत. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय अगदी ठप्प असल्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही रक्कम वाचवणार असल्याचे राजन म्हणले.
coronavirus:...म्हणून या शहरातील महापौरांनी घेतलं मृत्यूचं सोंग, शवपेटीत राहिले लपून
लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करता येईल हेअर कटिंग,अंकलने शोधून काढला अजब फंडा, एकदा पाहाच