लॉकडाऊनचे नियम पाळल्यास सोनं मिळणार; ग्राम पंचायतीची जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:25 PM2020-04-29T18:25:57+5:302020-04-29T18:48:43+5:30
लॉकडाऊनच्या या स्पर्धेत पहिला आलेल्या व्यक्तीला सोनं मिळणार आहे. दुसरं बक्षिस रेफ्रिजरेटर आणि तिसरं बक्षिस वॉशिंग मशिन असणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीसुद्धा बरेच लोक लॉकडाऊनचं पालन करताना दिसून येत नाही. अशा लोकांवर शासनाने कठोर पावलं उचलायलाी सुरुवात केली आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंग फार महत्वाचं आहे. लॉकडाऊनचं लोकांनी पालन करावं म्हणून केरळमधील एका गावातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे. लोकांना घरी राहा आणि सोनं जिंका असं आवाहन केलं आहे. फक्त सोनंच नाही तर लॉकडाऊनचं पालन केल्यानंतर वेगवेगळी बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लापुरम जिल्ह्यातील ताझीकोडे ग्रामपंचायतीने एक निर्णय घेतला आहे. यानुसार जे लोक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणार नाहीच . त्यांना सोनं किंवा बक्षिसं देऊन सन्मान करण्यात येईल. त्यातलं पहिलं बक्षिस सोनं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर पण हे खरं आहे. लॉकडाऊनच्या या स्पर्धेत पहिला आलेल्या व्यक्तीला सोनं मिळणार आहे. दुसरं बक्षिस रेफ्रिजरेटर आणि तिसरं बक्षिस वॉशिंग मशिन असणार आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन संपेपर्यंत आदेशाचं पालन करत असलेल्या लोकांना ५० वेगवेगळी बक्षिस दिली जाणार आहेत. ( हे वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)
ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या आदेशाचं पालन करावं यासाठी असा प्रयोग करण्यात आला आहे. ६ एप्रिलला ही योजना तयार करण्यात आली. ३ मे ला या योजनेतील लकी ड्रॉ काढला जाणार आहे. ( हे पण वाचा-बाटलीसाठी काही पण करु! सैन्याला हवी होती दारु; म्हणून युद्ध झाले सुरू)