अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण...
By अमित इंगोले | Published: October 14, 2020 01:52 PM2020-10-14T13:52:05+5:302020-10-14T13:56:52+5:30
सामान्यपणे बघितलं जातं की, कोबीचं फूल एक किंवा दोन किलोचं असतं. पण एक १७.२ किलोची कोबी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हिमाचल प्रदेशातील लाहौर स्पीतीमध्ये एका शेतकऱ्याने १७.२ किलो वजनाच्या एका कोबीचं पिक घेतलं आहे. या कोबीचा आकार आणि वजन पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सामान्यपणे बघितलं जातं की, कोबीचं फूल एक किंवा दोन किलोचं असतं. पण एक १७.२ किलोची कोबी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहौलच्या रलिंग गावातील शेतकरी सुनील कुमार याने ही कमाल केली आहे. सुनील कुमार हा ग्रॅज्युएट आहे. जैविक शेतीच्या माध्यमातून नवीन प्रयोग करून सुनील कुमारने १७.२ किलो वजनाची कोबी तयार केली आहे. (भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं)
त्यांनी केलेल्या प्रयोगातून तयार झालेली १७ किलोची कोबी पाहून देशातील कृषी विश्वविद्यालय आणि कृषी संशोधन केंद्रातील वैज्ञानिकांना हैराण करून सोडलं आहे. सगळेच अवाक् झाले आहेत. या शेतकऱ्याच्या परिवारातील लोकांनी सांगितले की, ते आधीपासूनच जैविक शेतीवर लक्ष केंद्रीत करतात. सामान्यपणे कोबीचं फूल दोन किलो किंवा एक किलोचं असतं. पण यावर्षी त्यांनी १७.२ किलोची कोबी उगवली आहे.
दरम्यान, लाहौल स्पीतिचे बटाटे आणि मटर देशभरात प्रसिद्ध आहेत. इथे या भाज्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. असंही म्हटलं तरी चालेल की, लाहौरची अर्थव्यवस्था या पिकांवर अवलंबून आहे. त्यासोबतच लाहौलमध्ये सफरचंदाचंही मोठं उत्पादन घेतलं जातं. (अरे व्वा! तब्बल १२४ वर्षांनी चमोली पर्वतांवर फुललं दुर्मिळ प्रजातीचं फुल; पाहा फोटो)
औरंगाबादमध्ये काश्मिरी सफरचंद
तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल सफरचंद काश्मिर, हिमाचल प्रदेशसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी पिकवले जातात. आता एका खास प्रकारचे सफरचंद बिहारमधील औरंगाबादच्या शेतकऱ्याने पिकवून चांगले उत्पन्न घेतलं आहे. अमरेश कुमार सिंह हे औरंगाबादच्या कर्महीड गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी सफरसंदाच्या खास प्रजातींची शेती आपल्या २ कठ्ठा जमिनीवर करायला सुरूवात केली आहे.
डिसेंबरमध्ये त्यांनी हरमन ९९ सफरचंदाची झाडं लावली होती. आता ही झाडं मोठी होऊन त्या झाडांवर फळंसुद्धा आली आहे. त्यांनी सांगितले की, एकदा झाडावरची सफरचंद तोडली होती. आता प्रोत्साहित होऊन उत्पन्न अधिक वाढवलं आहे. या सफरचंदाची किंमतही जास्त आहे. या प्रकारच्या सफरचंदाची शेती करून चांगले उत्पन्न घेता येऊ शकतं. कारण बाजारात मागणीही वाढत आहे.
या सफरचंदाच्या पीकांना हरमन ९९ असं नाव देण्यात आलं आहे. हरमन ९९ हे गरम वातावरणातही सहज पिकवलं जाऊ शकतं. अंगणात किंवा बगिच्यात हे झाडं लावता येतं. त्यांनी सांगितले की, आपला जिल्हा आणि बिहारच्या मातीत हे पीक सहज घेता येऊ शकतं.